देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 12:46 PM2023-08-01T12:46:45+5:302023-08-01T12:47:30+5:30

केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमांतून टिळकांनी इंग्रजांना घाम फोडला होता...

Shivaji Maharaj conducted the first surgical strike in the country sharad pawa | देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला- शरद पवार

देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला- शरद पवार

googlenewsNext

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (१ ऑगस्ट) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पाडला. यावेळी राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, जेष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक, विश्वस्त रोहित टिळक उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सामान्यांच्या जीवनात बदल घडविण्याचे काम पंतप्रधानांनी केले. लोकमान्य टिळकांचे स्वप्न आज पूर्ण करत आहोत. त्यांनी पाहिलेले ध्येयनिष्ठ देश निर्माण करत आहोत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. जगभरातील अनेकांना मोदींची भुरळ आहे. 

शरद पवार म्हणाले, देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांच्या काळात झाले. शायस्तेखानाची बोटं छाटने हाच पहिला सर्जिकल स्ट्राईक होता. देशात महाराष्ट्राचे महत्त्व वेगळे आहे. गणेशोत्सव, शिवजयंती यामध्ये लोकमान्य टिळकांचे मोठे योगदान आहे. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमांतून टिळकांनी इंग्रजांना घाम फोडला होता.

Web Title: Shivaji Maharaj conducted the first surgical strike in the country sharad pawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.