लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : छत्रपती शिवरायांचे राजकारण विज्ञानवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी होते! असे प्रतिपादन शिव व्याख्याते प्रा. श्रीमंत कोकाटे यांनी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे व्यक्त केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित पाच दिवसीय फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमालेत ह्यशिवरायांचे स्वराज्य व आजचे राजकारणह्ण या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना प्रा. कोकाटे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे होते; तसेच महापौर नितीन काळजे, शिवसेना शहराध्यक्ष राहुल कलाटे, मधुकर बाबर, नवनाथ वायाळ, उद्योजक सातव, राजेश म्हेत्रे, विठ्ठलराव जाधव आदी मान्यवरांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. मुख्य संयोजक मारुती भापकर यांनी प्रास्ताविक केले. दिगंबर बालुरे, दीपक मोरे, गोरख देवकाते, राहुल साळुंखे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. अभिजित शेंडगे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र घावटे यांनी आभार मानले.
शिवाजीमहाराजांचे राजकारण विज्ञानवादी
By admin | Published: May 13, 2017 4:34 AM