कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा राजगुरूनगर येथे झाली. या वेळी नूतन कार्यकारिणीची निवड झाली. एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असल्याने ज्येष्ठ सभासदांनी निवडणूकीचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. राजगुरूनगर एसटी आगारात शिवाजी शिंदे पाटील हे चालक म्हणून, तर रमेश वाडेकर हे वाहक पदावर कार्यरत आहेत.
अध्यक्षपदासाठी शिवाजी शिंदे पाटील, संतोष तिटकारे असे दोन उमेदवार होते, तर सचिव पदासाठी रमेश वाडेकर, दत्ता गभाले, बाळासाहेब नांगरे असे तीन उमेदवार होते. सुरुवातीला अध्यक्षपदासाठी राजेंद्र पवार, शरद साबळे, भरत वाबळे, हनुमंत बनकर आणि माणिक थिगळे यांनी देखील अर्ज दाखल केले होते. परंतु ऐन निवडणुकीच्या दिवशी या सर्वांनी शिवाजी शिंदे पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करत सर्व मतदारांना शिंदे पाटील यांना मते देण्याचे आवाहन केले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नीलेश पोटफाडे व मंगेश सावंत यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया सामाजिक अंतर राखून व मास्क वापरून संपन्न करण्यात आली.
भावी काळात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी रचनात्मक काम करून व प्रशासनाशी योग्य समन्वय साधून काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिवांनी सांगितले. याप्रसंगी भारत वाबळे, नीलेश सातकर, महादेव तुळसे, अमित जगताप, दिलीप चौधरी, दिलीप तापकीर, तसेच निमगावचे माजी सरपंच अमर शिंदे पाटील आदी उपस्थित होते.
फोटो : शिवाजी शिंदे पाटील