पुणे : मेट्रो तसेच बस पोर्टच्या कामासाठी शिवाजीनगर येथील एसटी बसस्थानक हलविण्याची प्रक्रिया रेंगाळली आले. मागील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मेट्रोचे काम सुरू केले जाणार होते. पण विविध कारणांमुळे या कामाला विलंब झाला आहे. आता जून महिन्यापर्यंत तरी बसस्थानक हलविण्यात येणार नसल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाजीनगर येथे एस.टी. महामंडळाच्या जागेवर महामेट्रोकडून भुयारी स्थानक बांधले जाणार आहे. याठिकाणी एसटीची सुमारे १५ हजार ७०० चौरस मीटर जागा आहे. महामेट्रोला एसटीकडून ३ हजार १८५ चौरस मीटर जागा दिली जाणार आहे. त्याबाबतचा करार झाला आहे. सध्या या जागेवर बसस्थानक, वर्कशॉप व एसटीची कार्यालये आहेत. एसटी महामंडळाकडूनही या जागेत बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. हे दोन्ही प्रकल्प एकत्र केले जाणार आहेत. आधी मेट्रोचे स्थानक व भुयारी मार्गाचे काम केले जाणार आहे. त्यानंतर बसपोर्टच्या कामाला सुरूवात होईल. सुमारे तीन वर्ष हे काम चालणार आहे. त्यामुळे येथील बसस्थानकासह, वर्कशॉप, कार्यालये अन्यत्र हलवावी लागणार आहेत. ऑक्टोबर महिन्यातच ही प्रक्रिया सुरू केली जाणार होती. मात्र, बसस्थानकासाठी जागा शोधण्यास बराच विलंब झाला.दोन-तीन महिन्यांपुर्वी वाकडेवाडी येथील अंडी उबवणी केंद्राजवळील सुमारे पाच एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेवर एसटी बस सोडण्यासाठी फलाट, बस देखभाल-दुरूस्तीसाठी तात्पुरते वर्कशॉप आणि अधिकाऱ्यांसाठी कार्यालये बांधून देण्याची जबाबदारी मेट्रोने घेतली आहे. त्याचा सर्व खर्चही मेट्रोच करणार आहे. पण अद्याप हे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे बसस्थानकाचे स्थलांतर अद्याप झालेले नाही. एसटीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोकडून अद्याप पर्यायी जागेवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही. त्यासाठी जुलै महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतरही स्थलांतर केले जाईल. -------------साखर संकुलात बसशिवाजीनगर बस स्थानकाच्या वर्कशॉपलगतच्या जागेमध्ये मेट्रोच्या भुयारी स्थानकाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. त्यामुळे त्याठिकाणी देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी बस उभ्या करणे शक्य होणार नाही. त्यासाठी साखर संकुलमध्ये उपलब्ध रिकामी जागा देण्यात आली आहे. सुमारे २५ बस साखर संकुलमधील आवारात उभ्या करण्यास सुरूवात केली आहे. मेट्रोकडून या जागेत भाडे दिले जाणार आहे. - ज्ञानेश्वर रणवरे, आगार प्रमुख, शिवाजीनगर एसटी बसस्थानक--------------
शिवाजीनगर बसस्थानक जुनपर्यंत ‘जैसे थे’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 8:27 PM
शिवाजीनगर येथे एस.टी. महामंडळाच्या जागेवर महामेट्रोकडून भुयारी स्थानक बांधले जाणार आहे.
ठळक मुद्देयाठिकाणी एसटीची सुमारे १५ हजार ७०० चौरस मीटर जागाएसटी महामंडळाकडूनही या जागेत बसपोर्ट उभारण्यात येणार बसस्थानकासह, वर्कशॉप, कार्यालये अन्यत्र हलवावी लागणार ऑक्टोबर महिन्यातच ही प्रक्रिया सुरू केली जाणार