पुणे : महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडी) शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो केली जात असून, केंद्र शासनाच्या ‘न्यू मेट्रो पॉलिसी’नुसार दुसºया टप्प्यासाठी नवीन प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, असे पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.पीएमआरडीएकडून ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप’(पीपीपी) तत्त्वावर २३ किलोमीटर अंतराची मेट्रो केली जाणार आहे. महामेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट, वनाझ ते रामवाडी आणि शिवाजीनगर-हिंजवडी या तीन मार्गिका असणार आहे. पीएमआरडीएकडून पीपीपी तत्त्वावर ही मेट्रो केली जात असली, तरी महामेट्रोसोबत संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडून देशातील मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी न्यू मेट्रो पॉलिसी तयार केली आहे. त्यानुसार सर्व मेट्रोचे सुधारित प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावे लागणार आहेत. मेट्रो दुसरा टप्पा रामनगर, लक्ष्मीनगर ते हिंजवडी, असा असेल. दुसºया टप्प्यासाठीचा प्रस्ताव ‘डीलॉइट आणि जेएसएल’ या खासगी संस्थेकडून तयार केला जाणार आहे़
शिवाजीनगर ते हिंजवडी मार्ग; मेट्रोचा प्रस्ताव केंद्राला पाठविणार, किरण गित्ते यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 6:49 AM