विजय भिसे : बारामतीत गणेश भाजी मंडई भोजन थाळीचा शुभारंभ
बारामती : कोरोनाकाळात सामान्य नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून शिवभोजन थाळीचा उपक्रम राज्यात सुरू केला आहे. गरीब, गरजूंना एकवेळचे पौष्टिक व स्वादिष्ट पुरेसे जेवण मिळावे, या उद्देशाने महाविकास आघाडी सरकारने हा उपक्रम राज्यात सुरू केला आहे. शिवभोजन थाळीचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा काँग्रेस (अनुसूचित जाती विभाग) कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय भिसे यांनी केले.
बारामती गणेश भाजी मंडई येथे शिवभोजन थाळी वाटपाचा शुभारंभ डॉ. भिसे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. गणेश भाजी मंडई शिवभोजन थाळी वाटप केंद्रावर १५० थाळी वाटपाची परवानगी आहे, दररोज सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंतची शिवभोजन थाळी वाटप वेळ आहे. शासनाच्या नियम व अटीनुसार शिवभोजन थाळी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संचालक प्रदीप लोणकर यांनी दिली. या वेळी दादा लोणकर, नितीन अंधारे, नितीन चालक, दादा जोगदंड, यांसह नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————
फोटो ओळी : डॉ. विजय भिसे यांनी गरीब, गरजू नागरिकांसाठी गणेश भाजी मंडई येथे शिवभोजन थाळी वाटप केंद्र सुरू केले.
०७०९२०२१-बारामती-०९
————————————————