कोरोनाकाळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावरदेखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात सकाळी ११ वाजेपर्यंत मिळणार आहे. सध्या शिवभोजन थाळी ही विनामूल्य असून पहिल्या १५० गरजूंना ती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महेश पोकळे यांनी सांगितले. या वेळी भारती विद्यापीठ परिवाराचे अध्यक्ष बाबा शिंदे, विभागप्रमुख महेश पोकळे, तसेच शिवसैनिक उपस्थित होते. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने धायरी परिसरातील गरीब जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
फोटो ओळ : धायरी येथील शिवभोजन थाळी या योजनेचा शुभारंभ करताना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, बाबा शिंदे, महेश पोकळे आदी.