वाकड (पुणे) :शिवजयंती निमित्त शिलाटने येथील ३० शिवभक्त मल्हार गडावर ज्योत घेऊन गेले होते. ते परत लोणावळा येत जात असताना ताथवडे परिसरातील मुंबई- बंगळुरू हायवेवर त्यांच्या टेम्पोला ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला. अपघातामध्ये २० ते २५ शिवभक्त जखमी झाले असून तीन जण गंभीर आहेत.
लोणावळा येथील शीलाटने येथील युवक मल्हार गडावर ज्योत घेऊन गेले होते. परत येत असताना त्यांच्या टेम्पोला पाठीमागून ट्रकने धडक दिली. टेम्पोच्या पुढे एक दुचाकी जात होत्या. त्या दुचाकीला देखील जोरात धडक बसल्याने दुचाकी स्वार जखमी झाला आहे. सात ते आठ जणांना गंभीर मुका मार लागला आहे. तर, वीस जणांना किरकोळ मार लागला आहे. सर्व जखमींना तळेगाव, रावेत येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सुरक्षा रक्षक मदतीला धावलाबंगळुरू- मुंबई बायपासवर ताथवडे परिसरात पहाटे साडे चार वाजता हा अपघात झाला. अपघात पहाटे झाल्याने जखमींना तातडीने मदत मिळाली नाही. आजूबाजूच्या शोरुममधील सुरक्षा रक्षक धावत जागेवर आले. त्यांनी अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पाठीमागून धडक बसल्याने काही तरुण अडकले होते. सकाळी सहाच्या सुमारास आजूबाजूच्या नागरिकांची मदत मिळाली. तो पर्यंत पोलीस घटनास्थळी आले होते. नागरिकांनी टेम्पो हलवत सर्वांना बाहेर काढले. धडक बसली तेव्हा काही जण झोपेत होते. अचानक घडलेल्या घटनेने काय झालंय हे समजत नव्हते. भेदरलेल्या अवस्थेत असल्याने आरडाओरडा करत होते.
रस्त्यावर काचांचा खच
अपघातामुळे रस्त्यावर काचांचा खच पडला होता. जखमी याच काचांवरून अनवाणी पायाने चालत होते. आजूबाजूला गर्दी जमू लागल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. मदतीसाठी गाडी थांबली तरी गर्दी मधून बाहेर पडायला वेळ लागत होता.
गावात शांतातासकाळी गावात लवकर पोहोचून गावात ज्योतीचे स्वागत होणार होते. गावात मित्र मंडळीनी तशी तयारी केली होती. त्यानंतर शिवजयंती साजरी केली जाणार होती. दोन महिने आधी पासून तशी तयारी केली होती. कोणी किती अंतर पळायचे याचे सर्व तयारी झाली होती. सोबत पांघरून, खाण्याचे समान सर्व घेऊन हे युवक निघाले होते. अपघाताता नंतर गावात शांतता आहे.