मंचर : अवसरी खुर्द येथे जुन्नर, शिरूर, खेड व आंबेगाव तालुक्यासाठी होत असलेले शिवनेरी जम्बो कोविड रुग्णालय पुर्ण होत आले असून दि.१० जूनपर्यंत सुरु होणार आहे. एकाच ठिकाणी सर्व सोईसुविधांयुक्त अद्यावत रुग्णालय उभे राहत असल्याने रुग्णांना तातडीची सेवे देणे शक्य होणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
अवसरी खुर्द येथे चार तालुक्यासांठी होत असलेल्या शिवनेरी जम्बो कोविड रुग्णालयच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंचर येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. अभिजीत देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, तहसीलदार रमा जोशी, डॉ. अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता बी.एन.बहिर इत्यादी उपस्थित होते.
अवसरी खुर्द येथे होत असलेल्या शिवनेरी जम्बो कोविड रुग्णालयाच्या खर्चात इतर ठिकाणी कोविड सेंटर होवू शकतील असे काही लोक म्हणत आहेत. मात्र या सेंटरचा फायदा चारही तालुक्यांना होणार आहे, एका ठिकाणी सर्व अद्यावत रुग्णालय उभे राहिले तर रुग्णांना सुविधा देणे सोपे जाते. या कोविड रुग्णालयासाठी २४ कोटी रूपये खर्च येणार असला तरी या रकमेतून यंत्रसामुग्रीसाठी २.३१ कोटी, ऑक्सिजनसाठी ३.३५ कोटी, इलेक्ट्रिक कामासाठी ५० लक्ष, बांधकामासाठी ५० लक्ष रूपये असे जवळजवळ सहा कोटी रूपये हे रुग्णालय उभारण्यासाठी खर्च येणार आहे. बाकीचा उरलेला १८ कोटी रूपये वर्ष भरात रुग्णालयातील औषधे, मनुष्यबळ, स्वच्छता, जेवण यासाठी खर्च होणार आहेत. तसेच हे पैसे वर्षभरात खर्च होतीलच असे नाही तर ही तरतूद करुन ठेवली आहे. त्यामुळे शिवनेरी जम्बो कोविड रुग्णालय चार तालुक्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
अवसरी खुर्द येथे होत असलेल्या शिवनेरी जम्बो कोविड रुग्णालय अतिशय कमी खर्चात उभे राहत आहे. पुण्यात उभारण्यात आलेल्या विप्रो कोविड रुग्णालयासाठी सुमारे ८० कोटी रूपये खर्च आला. त्यातुलनेत हे रुग्णालय कमी खर्चात व अतिशय कमी वेळेत प्रशासनाच्या सहकार्यामुळे उभे राहत आहे असे शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा यांनी सांगितले.
तालुक्यात आरोग्य केंद्रावर दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरु असले तरी यातून शिल्लक रहाणाऱ्या लसी ४५च्या वरील ज्यांनी पहिला लसीचा डोस घेतला नाही त्यांना दिल्या जाणार आहे. यामध्ये आदिवासी भागातील लोकांच्या लसीकरणावर भर दिला जाणार असल्याचे पंचायत समिती सभापती संजय गवारी यांनी सांगितले.
मंचर येथे आयोजीत बैठकीत उपस्थित गृह मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच जिल्हास्तरीय अधिकारी, पदाधिकारी