शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शिवनेरी गडास झळाळी!

By admin | Published: February 17, 2015 11:31 PM

किल्ले शिवनेरीवर जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेली दगडी फरसबंदी वाट शिवनेरीच्या गतकालीन वैभवाची आठवण करून देत आहे.

लेण्याद्री : किल्ले शिवनेरीवर जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेली दगडी फरसबंदी वाट शिवनेरीच्या गतकालीन वैभवाची आठवण करून देत आहे. नव्याने मजबुतीकरण करण्यात आलेल्या गडाचे सात दरवाजे शिवप्रेमी-दुर्गप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. स्वराज्यद्रोही गुन्हेगारांना देहदंडाची शिक्षा देण्यात येत असलेला कडेलोट कडा आता आकर्षक ‘व्हू पॉर्इंट’ बनला आहे. तर, पूर्वी दगडगोटे, पडके अवशेष यांच्या सोबतीने जाणारी पायवाट आता हिरवळीचा गालीचा, आकर्षक फुलांचे ताटवे यांच्या सोबतीने शिवनेरीची चढण अधिकच सुकर होत आहे. हे चित्र आहे छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवरील.दुर्गराज शिवनेरीवरील विविध दुर्गसंवर्धक विकासकाने आता पूर्णत्वास येत असून, गडाला शिवकालीन ऐतिहासिक झळाळी प्राप्त झाली आहे. ऐतिहासिक दुर्गबांधणीतील एक ‘मॉडेलफोर्ट’ म्हणून किल्ले शिवनेरीची ओळख बनली आहे. किल्ले शिवनेरीचे हे पालटलेले रूप राज्यातील इतर किल्ल्यांच्या संवर्धनाला चालना देणारे ठरणारे आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीला राष्ट्रीय स्थळाचा दर्जा केंद्र शासनाने दिलेला आहे.दगडमातीच्या ढिगाऱ्यांच्या अवशेषरूपाने उरलेल्या ऐतिहासिक वास्तू, अशी शिवनेरीची सन २००४ पर्यंतची परिस्थिती होती. महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय पुरातत्त्व विभाग, किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळ यांच्या माध्यमातून शिवनेरीस आजचे शिवकालीन दुर्गबांधणीचे ‘मॉडेलफोर्ट’ बनविण्याचा प्रकल्प सन २००४ पासून हाती घेण्यात आला. सामाजिक रेटा व राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीमुळे शिवनेरीचे विलोभनीय रूप आज समोर येत आहे. शिवनेरीवर विविध शासकीय विभागाच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. तर, काही कामे पूर्णत्वास आलेली आहेत. (वार्ताहर)४शिवजन्मस्थळ इमारतीची विशेष देखभाल करण्यात येत आहे. विद्रूप केलेल्या विविध वास्तूंच्या भिंती स्वच्छ करण्यात आल्या आहेत. ४वीजरोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे. किल्ले शिवनेरीची गडदेवता शिवाई देवीच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.४शिवजन्मस्थानासमोरील संपूर्ण प्रांगणामध्ये दगडी फरसबंदी नजरेला सुखावते. अंबारखाना, कोळी चौथरा, ईदगाह आदी वास्तूंची दुरुस्ती-संवर्धनाचे नियोजन आहे. ४शिवनेरीच्या पायथ्याशी ६० लाख खर्चाचे आकर्षक घडीव दगडी बांधणीतील वेस (प्रवेशद्वार) बांधण्यात आले आहेत. गावात शिवसृष्टी उभारण्यात आली आहे.४वनविभागाच्या वतीने पाच किलोमीटर लांबीची संरक्षक दगडी बांधणीतील भिंत उभारण्यात आलेली आहे. गडावर आकर्षक ‘लॅँडस्केपिंग’ करण्यात आले आहे. आकर्षक बागबगीचा फुलविण्यात आला आहे. मृदृसंधारणाची कामे पूर्णत्वास येत आहेत. किल्ल्यावर बारमाही पाण्यासाठी वडज धरणातून ४० लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेली आहे.४भारतीय पुरातत्त्व विभागाने गडावरील विविध वास्तूंची ऐतिहासिक धाटणीत पुनर्रभरणा केली आहे. यामध्ये गडावर जाणाऱ्या पूर्ण पायरी मार्गावर, सपाटीवर घडी व दगडातील फरसबंदी करण्यात आली आहे. सातही दरवाज्यांची आवश्यक ठिकाणी पुनर्बांधणी करण्यात आली आहे. गडावरील बुरुंजयुक्त वेशींना मजबूत वजनदार सागवानी दरवाजे बसविण्यात आले आहेत. धोकादायक कडेलोट कड्याचे रूपांतर आकर्षक ‘व्ह्यू पॉर्इंट’मध्ये करण्यात आले आहे.