पिंपरी : आज शिवाजीमहाराज असते, तर कोट्यवधी रुपये खर्च करून अरबी समुद्रात पुतळा उभारण्यासाठी त्यांनी स्वत:च विरोध केला असता, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांनी केले. चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाचदिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ते बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद पवार अध्यक्षस्थानी होते; तसेच बाळासाहेब मरळ, मुख्य संयोजक राजाभाऊ गोलांडे, मंडळाचे सचिव गजानन चिंचवडे, प्रदीप पवार उपस्थित होते. सरोदे म्हणाले, ‘‘नुसते उंच झेंडे लावले आणि कोट्यवधी रुपये उधळून पुतळे उभारले, की सर्वसामान्य माणसांच्या जगण्यात कोणता फरक पडतो; परंतु असा प्रश्न विचारण्याची कोणी हिंमत करू शकत नाही.’’कालिदास यादव, सुहास पोफळे, महेश गावडे, ज्ञानोबा जाधव, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजन केले. वैभव गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. महेश बारसावडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)अतुलनीय भारत’ यांसारख्या फसव्या जाहिराती केल्या जातात. नागरिकांकडून कररूपाने गोळा झालेल्या पैशांतून मोठे बॅनर लावले जातात; पण अशा प्रतीकात्मक पद्धतीने देशप्रेम व्यक्त केल्याने लोकशाही सुदृढ होत नाही किंवा समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचत नाही. राजकीय पक्ष आपले हेतू साध्य करण्यासाठी मोर्चे, आंदोलने करून विध्वंसक कारवाया करतात आणि सर्वसामान्य लोकांना वेठीस धरतात, असे सरोदे म्हणाले.प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याची गरजनुसती ‘मन की बात’ नको, आता थेट लोकांशी बोला. शासनाच्या चुकीच्या निर्णयांना ठाम विरोध केलाच पाहिजे. इंदिरा गांधी यांनी लोकशाहीविरोधी भूमिका घेताच जनतेने त्यांना उखडून फेकून दिले. आताच्या सरकारची त्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. ज्या वेळी एखादा राजकीय पक्ष खूप वाढतो, त्या वेळी सामान्य माणसांवर अन्याय वाढतो आहे. याचे ते लक्षण असते. निवडणुका जिंकल्या आणि बहुमत प्रस्थापित झाले म्हणजे तो राजकीय पक्ष चांगला असे मुळीच नसते. ईव्हीएम मशिन घोटाळा, अवास्तव टोल आकारणी, भयमुक्त राजकारण अशा अनेक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला पाहिजे, असे सरोदे म्हणाले.
... तर शिवरायांनी विरोध केला असता!
By admin | Published: May 01, 2017 2:34 AM