चंदननगर : भाजपा-शिवसेनेची युती तुटल्यापासून शिवसेना भाजपाला शिव्या देऊन मते मागत असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज चंदननगर-खराडी प्रभाग क्र. ४ मधील आनंदपार्क, गणेशनगर येथील सभेत केले.भारतीय जनता पार्टीचे खराडी-चंदननगर, वडगावशेरी, विमाननगर प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आज संध्याकाळी सभेचे आयोजन केले होते. ते म्हणाले, ‘‘राज्यात झालेल्या नगरपालिका व नगर परिषदांमध्ये भाजपा हा नंबर एकचा पक्ष आहे. त्याच पद्धतीने मतदार मनपा व जि.प. तसेच पं.स.मध्ये भाजपाला मते देऊन विजयी करतील.’’आमदार जगदीश मुळीक म्हणाले, आम्हाला लोकांनी निवडून दिले. तुम्हाला पवारांनी निवडले. या वेळी आमदार जगदीश मुळीक, योगेश मुळीक, सचिन सातपुते, शैलजित बनसोडे, बबडाबाई पठारे, सोनल चव्हाण, संदीप जऱ्हाड, शीतल शिंदे, सुनीता गलांडे, कर्णे गुरुजी, श्वेता गलांडे, मुक्ता जगताप, अर्जुन जगताप, नाना आबनावे , राजू घुले, ज्ञानेश्वर शिंदे, शशी बोडके, शर्मिला शिंदे, देविदास गलांडे, नितीन शिंदे, प्रमोद येरुणकर, मारुती गलांडे, ए. आर. मिश्रा, नवनाथ पठारे, विशाल साळी, गीता परदेशी, स्मिता पवार, कविता पवार, किरण तिवारी, संतोष धुमाळ याप्रसंगी उपस्थित होते.
मतांसाठीच शिवसेनेच्या भाजपाला शिव्या
By admin | Published: February 18, 2017 3:50 AM