चाकण : येथील पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडीला त्रस्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर खळ्ळखट्याक आंदोलन केले. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून महामार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी झाल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
पुणे-नाशिक महामार्गाची आमदार सुरेश गोरे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी नुकतीच पाहणी केली होती. तसेच चाकण पोलीस ठाण्याचे एसीपी चंद्रकांत अलसटवार, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, आयआरबी रस्ते कंपनीचे अधिकारी यांच्यासह तळेगाव चौकात महामार्गावर फिरून पाहणी केली. व वाहतूककोंडीचा प्रश्न समोर आणला. यामुळे गोरे यांनी सर्व अधिकारी व सरपंच सिद्धेश्वर नाणेकर यांना सूचना केल्या. तसेच सर्व व्यावसायिक दुकानदारांना आपल्या दुकानासमोरील अतिक्रमणे स्वत:हून काढून घेण्याचे आवाहनकेले व व्यावसायिकांनीही प्रतिसाद दिला.महामार्गावर एकही अवैध वाहन उभे करू दिले नाही. तळेगाव चौकातील सिग्नलपासून नाणेकरवाडी उड्डाणपुलापर्यंत जेसीबीच्या साहाय्याने राडारोडा काढण्यात आला. उड्डाणपुलावरील व पुलाच्या खालचा कचºयाचा ढीग हटविण्यात आला.