जेजुरी : सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर शिवरी (ता.पुरंदर) येथे बस चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगात येणारी शिवशाही बस यमाई माता मंदिराला व बाजुच्या हॉटेलला जोरात धडकली. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात बसच्या चालकासह दोन प्रवासी जखमी झाले. पुणे येथून बारामतीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.यामध्ये चालक गणेश पांडुरंग भापकर (वय ३४ रा. लोणी भापकर,ता.बारामती)हा गंभीर जखमी झाला आहे. तर गोरख भगवान राऊत (वय ६८ रा.चिंचवड,पुणे), विक्रम लक्ष्मण घाडगे (वय ४४ ससाणेनगर,हडपसर पुणे) हे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.यांच्यावर सासवड येथील खाजगी रूग्नालयात उपचार सुरू आहेत. याठिकाणी प्रत्यक्षदर्शी मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडुन डाव्या बाजूने येणारी बस पुर्णपणे रस्त्याच्या विरुद्ध उजव्या बाजुला येऊन यमाई माता मंदिर, बाजुच्या हॉटेलला जोरात धडकली व पुन्हा रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन थांबली. याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन अधिक तपास करीत आहेत.पावसामुळे मोठा अनर्थ टाळला.या हॉटेलच्या बाहेर नियमितपणे वीस ते पंचवीस नागरिक बसलेले असतात. मात्र, आज सकाळी सकाळीच पाऊस सुरू झाल्याने हे सर्व नागरिक समोरील पालखी विसावा सभा मंडपात निवाऱ्यासाठी बसले होते. तर यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने नव्हती. यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा या विचित्र अपघातामध्ये मोठी जीवितहानी झाली असती.यावर त्यांनी पोलिसांच्या पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे.
सासवड - जेजुरी महामार्गावर शिवरी येथे शिवशाही बस धडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 7:08 PM
पुणे येथून बारामतीच्या दिशेने जात असताना हा बसला हा अपघात झाला..
ठळक मुद्देचालकासह दोन प्रवासी जखमी