पुणे : स्वारगेट ते सांगली प्रवासी घेऊन निघालेल्या शिवनेरी बस शिंदेवाडी घाटात ५० ते ६० फुट खाली कोसळली. ही घटना दुपारी दोन च्या सुमारास घडली. घाटात कोसळतांना जवळपास चार ते पाच वेळा बस पलटी झाली. यात एक जन जागीच ठार झाला. तर १७ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ आणि राजगड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.स्वारगेट ते सांगली प्रवासी बस दुपारी १ च्या सुमारास स्वारगेट स्थानकावरून सांगलीसाठी निघाली होती. बस मध्ये ४० ते ४५ प्रवासी होते. ही बस कात्रज ओलांडून शिंदेवाडी घाटात आल्यावर एका अवघड वळणावर चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस थेट घाटात सुमारे ५० ते ६० फुट खाली कोसळली. कोसळतांना ही बस सुमारे चार ते पाच वेळा पलटी झाली. या घटनेन एक प्रवाशी जागीच ठार झाला तर सुमारे १७ जण गंभीर जखमी झाले. मृत प्रवाशाचे नाव समजु शकले नाही. या अपघातात बसचा चक्काचुर झाला. जखमींना उपस्थित काही नागरिकांनी आणि उपचारासाठी जवळील दवाख्यान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच राजगड पोलीसा ठाण्याचे पोलीस, भारती विद्यापीठाचे पोलीस तसेच बिट मार्शल पोहचले. त्यांनी इतर जखमींना तातडीने रूग्णालयात पोहचविले.
शिंदेवाडी घाटात शिवशाही बस दरीत कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 3:00 PM
स्वारगेट ते सांगली प्रवासी बस दुपारी १ च्या सुमारास स्वारगेट स्थानकावरून सांगलीसाठी निघाली होती. एक ठार : १७ प्रवाशी गंभीर जखमी
ठळक मुद्दे एक ठार : १७ प्रवाशी गंभीर जखमी बसमध्ये ४० ते ४५ प्रवासीचालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस थेट घाटात सुमारे ५० ते ६० फुट खाली कोसळली