शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

शिवसृष्टी होणार बीडीपीतच ? चांदणी चौकापर्यंत नेण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 3:41 AM

कचरा डेपो येथील मेट्रो स्थानकाच्या जागेवर न करता महापालिकेचा शिवसृष्टी प्रकल्प त्यापुढेच असणा-या बीडीपीच्या (जैवविविध उद्यान-टेकडी) जागेवर करण्याबाबत मेट्रोनेच प्रस्ताव ठेवल्याचे समजते. त्यासाठी वनाझपर्यंतचा मेट्रो मार्ग पुढे चांदणी चौकापर्यंत नेण्याची तयारी आहे.

पुणे  - कचरा डेपो येथील मेट्रो स्थानकाच्या जागेवर न करता महापालिकेचा शिवसृष्टी प्रकल्प त्यापुढेच असणा-या बीडीपीच्या (जैवविविध उद्यान-टेकडी) जागेवर करण्याबाबत मेट्रोनेच प्रस्ताव ठेवल्याचे समजते. त्यासाठी वनाझपर्यंतचा मेट्रो मार्ग पुढे चांदणी चौकापर्यंत नेण्याची तयारी आहे.महामेट्रो कंपनीतील वरिष्ठ सूत्रांनी याची माहिती दिली. वनाझ येथील कचरा डेपोच्या सुमारे २८ एकर जागेवर महापालिकेने कचरा डेपो बंद केल्यानंतर शिवसृष्टी प्रकल्प प्रस्तावित केला होता. तत्कालीन उपमहापौर दीपक मानकर यांनी त्याचा पाठपुरावा करून विषय मंजूर केला, ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची त्यासाठी नियुक्ती करून घेतली; मात्र त्यानंतर मेट्रोची चर्चा सुरू झाली व वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गासाठीही शिवसृष्टीचीच जागा प्रस्तावित करण्यात आली.हीच जागा हवी, अशी मानकर व अन्य शिवप्रेमींची अपेक्षा आहे. या संदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेऊन मुंबईत बैठक आयोजित केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होणार होती; मात्र त्याला तब्बल चार महिने झाले तरीही ही बैठक अद्याप झालेलीच नाही. मानकर यांनी त्यासाठी आंदोलनाचाही इशारा दिला आहे. दरम्यान, काही घडामोडींमध्ये आता महामेट्रो कंपनीने शिवसृष्टी सध्याच्या जागेच्या पुढे काही अंतरावर असणाºया बीडीपीच्या जागेवर न्यावी, असा प्रस्ताव दिला असल्याची माहिती मिळाली.सुमारे ६५ ते ७० एकर जागेवर ही टेकडी आहे. ती जैवविविध उद्यान म्हणून आरक्षित आहे. या टेकडीवर शिवसृष्टी केल्यास ती अधिक चांगली होऊ शकते, असे मेट्रोच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. मेट्रो या टेकडीपर्यंत नेण्याचीही यासाठी त्यांची तयारी आहे. साधारण २ किलोमीटर इतके हे अंतर आहे. भुसारी कॉलनी व चांदणी चौक अशी दोन स्थानके यात येतील. एका किलोमीटरचा मेट्रोचा खर्च साधारण १२५ कोटी रुपये आहे. त्याचा प्रकल्प आराखडा तयार करून हा मार्ग सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामाबरोबरच करण्याचीही महामेट्रोची तयारी आहे. तसा लेखी प्रस्तावच त्यांनी दिला असल्याची माहिती मिळाली.खुद्द नितीन देसाई यांनीही टेकडीसारखे क्षेत्रफळ मिळाले तर तिथे अधिक चांगल्या प्रकारे शिवसृष्टी उभी करता येईल, असे मत खासगीत व्यक्त केले असल्याचे महामेट्रोमधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यामुळेच शिवसृष्टीचा विषय रेंगाळत न ठेवता त्यावर त्वरित निर्णय व्हावा, असे त्यांचेम्हणणे आहे. ११ हजार कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पामध्ये अधिक २०० कोटी रुपये झाले, तर त्यामुळे काही फरक पडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली असल्याची माहिती मिळाली.दरम्यान, या विषयावर महापालिकेने १७ जानेवारीला खास सभेचे आयोजन केले आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक व्हावी, अशी मागणी दीपक मानकर यांनी केली़सरकार किती शिवप्रेमी आहे तेच आम्हाला पाहायचे आहे. बीडीपीच्या जागेच्या प्रस्तावाचे माहिती नाही. मुळात ही जागा ताब्यात आहे का? त्यावर नियमाप्रमाणे असे बांधकाम करता येते का? मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक व्हावी,ही आमची मागणी सातत्याने टाळली जात आहे. शिवसृष्टीबाबत कोणतीही तडजोड पुणेकर शिवप्रेमी सहन करणार नाहीत.- दीपक मानकर, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे