शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

राष्ट्रवादी काँग्रेसला झटका? माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरेच ४ एप्रिलपर्यंत कामकाज पाहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 8:09 PM

राज्यात लक्षवेधी ठरली माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचावर्षिक निवडणूक

ठळक मुद्देमाळेगाव कारखान्याच्या निवडीला अवघे चोवीस तास उरले असताना उच्च न्यायालयाचा निकाल

बारामती : माळेगाव कारखान्याच्या निवडीला अवघे चोवीस तास उरले असताना उच्च न्यायालयाने दिलेला निकाल राष्ट्रवादी काँग्रेसला झटका मानला जात आहे.  कारखान्याची मागील निवडणूक ४ एप्रिल २०१५ रोजी झाली होती.त्यामुळे पाच वर्षांचा कार्यकाळ विचारात घेता जुन्या संचालक मंडळाची मुदत ४ एप्रिल २०२० रोजी संपत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार माळेगांव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांना ४ एप्रिलपर्यंत कामकाज पाहणार आहे.  

राज्यघटनेच्या ९७ व्या घटना दुरूस्तीच्या तरतुदीनुसार पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करण्याचा पदाधिकाऱ्यांना अधिकार आहे. या निकालामुळे ८ मार्च रोजी निवड होणाऱ्या नुतन कारभाऱ्यांना कारभार हाती घेण्यासाठी २६ दिवस वाट पाहावी लागणार आहे.   उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांनी माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे व त्यांचे संचालक मंडळ ४ एप्रिलपर्यंत कारखान्याचे कामकाज पाहतील असा निकाल दिला आहे. राज्यटनेच्या ९७ व्या घटना दुरूस्तीच्या तरतुदीनुसार निवडून आलेल्या पदाधिकाºयांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद करण्यात आला होता.हा युक्तीवाद ग्राह्य मानुन हा निकाल देण्यात आला आहे.  राज्यात लक्षवेधी ठरलेल्या माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या पंचावर्षिक निवडणूकीत उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी १७ जांगांवर विजय मिळवत बाजी मारली. पवार यांच्या विरोधात लढत देताना अध्यक्ष तावरे यांच्या विचारांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलने कडवी लढत दिली.  तावरे यांच्या पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले. निकाल लागल्यानंतर अवघ्या चौथ्या पाचव्या दिवशीपासुनच कारखान्यात दोन गटात कारभारावरुन झालेला वाद रंगला. २९ फेब्रुवारी रोजी कार्यकारी संचालकांना दोन्ही गटाच्या संचालकांनी घेराव घातला.यावेळी अतिरीक्त पोलीसांना बोलावुन परीस्थिती हाताळण्यात आली.त्यामुळे  अध्यक्ष तावरे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. सहकार तज्ञांचा सल्ला घेत त्यांनी ९७  व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीनुसार दाद मागितली.त्याला यश येवुन तावरे यांच्याबाजूने उच्च न्यायालयाने निकाल दिला.त्यामुळे अध्यक्ष तावरे यांना किमान २६ दिवसांचे कारभारी म्हणुन काम पाहता येणार आहे. अध्यक्ष तावरे यांच्या बाजुने  अ‍ॅड. ऐ.व्ही. अंतुरकर, अ‍ॅ ड. अमोल गटणे, सहाय्यक अ‍ॅड. जी.बी.गावडे, शाम कोकरे यांनी न्यायालयापुढे बाजु मांडली.याप्रकरणी  माळेगावचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ संंचालक बाळासाहेब तावरे यांनी हा निकाल लागल्याचे समजले,परंतु हा निकाल आमच्यापर्यंत पोहचलेला नाही.त्यामुळे  निकाल पाहिल्यानंतर अधिक बोलणे योग्य ठरेल, अशी प्रतिक्रीया ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केली.————————————————

...माळेगांव चा कारभारी कोण?माळेगांव कारखान्याच्या नुतन कारभाºयांची निवड रविवारी(दि ८) होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द त्यासाठी अंतिम मानला जाणार आहे.या पदांसाठी अनुभवी पदाधिकाºयांबरोबरच नविन चेहरा,नव्या दमाच्या चेहºयाचा विचार उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडुन केला जावु शकतो.यामध्ये माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, बारामतीचे माजी नगराध्यक्ष योगेश जगताप,ज्येष्ठ नेते केशव जगताप यांच्या नावाची चर्चा आहे. माजी नगराध्यक्ष जगताप यांनी गेल्या चार वर्षांत सभासदांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत सत्ताधाºयांबरोबर केलेला संघर्ष,गाजविलेल्या सर्वसाधारण सभा,पक्षाची एकनिष्ठता या त्यांच्या जमेच्या बाजु आहेत.मात्र, उपमुख्यमंत्री पवार कारखान्याची सुत्रे कोणाच्या हाती देतात,याकडे जिल्हाच नव्हे ,तर संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.———————————————...शेवटी न्यायदेवतेने न्याय दिला. याप्रकरणी अध्यक्ष रंजन तावरे यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना सांगितले कि, २५ फेब्रुवारी रोजी संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल लागला.मात्र, कायद्याने अभिप्रेत असणारा आमचा कार्यकाळ सुरु होण्यापुर्वीच विरोधी गटाच्या नवनिर्वाचित संचालकांनी  चाळीस दिवस अगोदर हस्तक्षेप करण्यास सुरवात केली.कारखान्याचे अधिकारी रजेवर पाठविणे,दप्तर ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राज्यातील सत्तेच्या जोरावर लोकशाहिचा गळा घोटण्याचे काम त्यांनी केले.दबावामुळे अधिकाºयांनी देखील दाद दिली नाहि.शेवटी न्यायदेवतेने न्याय दिला.मिळालेल्या कार्यकाळात सभासद हिताचेच निर्णय घेवु,असे अध्यक्ष तावरे यांनी सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस