सासवड : पुरंदर तालुक्यातील हिवरे गावाजवळ असलेल्या एका शेतातील बोअरवेल चालू करण्यासाठी तरुणी गेली असता विजेचा शॉक बसून तिचा मृत्यू झाला. रेखा धोंडिबा पवार (वय १७) असे या तरुणीचे नाव आहे. धोंडिबा पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. धोंडिबा पवार यांची रेखा मुलगी असून, पवार कुटुंबीय मु. महादपुरा, ता. पूर्णा, जिल्हा परभणी येथील राहणारे आहेत. शेतीच्या कामासाठी ते हिवरे जवळील फार्महाऊस मध्ये राहात आहेत. गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास रेखा बोअरवरील मोटार चालू करण्यास गेली असता, तिला शॉक बसला. तिला सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब टापर तपास करीत आहेत .
शॉक बसून तरुणीचा मृत्यू
By admin | Published: April 28, 2017 5:51 AM