शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

पुण्यात राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविकेचा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 19:34 IST

रेखा टिंगरे या कळस धानोरी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन वेळेस नगरसेविका राहिल्या आहेत.

चंदननगर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रेखा टिंगरे या कळस धानोरी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन वेळेस नगरसेविका राहिल्या आहेत.

रेखा टिंगरे ह्या 2007, 2012,2017 ह्या सलग तिन वेळा धानोरी-विश्रांतवाडी भागातून निवडून येत आहेत. त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्काच आहे. रेखा टिंगरे यांचे भावकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे असुन देखील त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी का दिली? हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.  रेखा टिंगरे यांची कन्या कोमल कुटे-टिंगरे ,पती यांनीही यापुर्वीच भाजपात प्रवेश केला होता. रेखा टिंगरे ह्या केवळ पक्षांअंतर्गत कायदा मुळे त्या राष्ट्रवादीत होत्या. आता नगरसेवकपदाचा कार्यकाळही पुर्ण झाल्याने त्यांनी प्रवेश केला. याबाबत रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

''२०१९ विधानसभा निवडणुकीत यांनी भाजपला मदत करून एकप्रकारे भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने पक्षाला काहीही फरक पडणार नाही. त्यांना त्यांच्या भावी कारकर्दीस शुभेच्छा. - सुनिल टिंगरे,आमदार वडगावशेरी विधानसभा''

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलVishrantwadiविश्रांतवाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा