पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात २६ वर्षीय तरुणीने घरामधे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार आज शुक्रवारी दि.२६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडीस आला.माधुरी तानाजी जगदाळे (वय: २६ वर्षे, रा. गणेशनगर, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी ही सिंहगड कॉलेज मध्ये अकाऊंटंट म्हणून काम करीत होती. तर तिची आई ही नवले हॉस्पिटल मध्ये कामास असून तिचा भाऊ पूना हॉस्पिटल येथे कामास आहे. आज माधुरीला सुट्टी असल्याने ती घरी होती. दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान तिचा भाऊ व तीने एकत्र मिळून जेवण केले. त्यानंतर तिने भावास मी आराम करते, तू बाहेरून कुलूप लावून जा असे सांगितले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिची आई कामावरून आल्यानंतर त्यांनी कुलूप काढून दरवाजा उघडल्यानंतर बेडरूममधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले असता तिचा अगोदरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करीत आहे.