शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

धक्कादायक ! टाळेबंदीच्या काळात पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे वाढले प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 4:19 PM

पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये बाल अश्लील सामग्रीला प्रचंड मागणी

ठळक मुद्देपोर्नोग्राफी साठी जास्त मागणी आयसीपीएफ चे निरीक्षणभारतातील बाल लैंगिक अत्याचार सामग्री यानावाचा हा अहवाल या संस्थेने प्रसिद्ध

पुणे :  देशात टाळेबंदी लागू झाल्यापासून  चाइल्ड पॉर्न, सेक्सी चाईल्ड आणि टीन सेक्स व्हिडिओ यांसारखे शब्द इंटरनेटवर टाकून त्यातून वेबसाईट पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे, अशी धक्कादायक माहिती ऑनलाईनडाटा मॉनिटरींग वेबसाईट्सच्याा अहवालातून समोर आली आहे. पोर्नहब याजगातील सर्वात मोठ्या पोर्नोग्राफी वेबसाइटवरील आकडेवारीवरून टाळेबंदीपूर्वी चाईल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे सरासरी प्रमाण आता तुलनेने24 ते 26 मार्च  दरम्यान 95 टक्क्यांनी वाढले असल्याचे निरीक्षण भारतीय बाल संरक्षण निधीने (आयसीपीएफ) नोंदविले आहे.

पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये बाल अश्लील सामग्रीला प्रचंड मागणी असल्याचे म्हटले आहे. नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता, भुवनेश्वर आणि इंदूर यांसारख्या 100शहरांमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी किती मागणी आहे, या बाबतचे संशोधन आयसीपीएफने केले. भारतातील बाल लैंगिक अत्याचार सामग्री यानावाचा हा अहवाल या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. डिसेंबर 2019 मध्ये 100शहरांमध्ये सार्वजनिक वेबवर चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी सरासरी 50 लाख इतकी दरमहा मागणी होती, ती आता वाढली आहे. या अहवालानुसार, मुले गुदमरणे, त्यांना रक्तस्राव होणे आणि त्यांचा छळ होणे, या स्वरुपाच्या हिंसक सामग्रीच्या मागणीत 200 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई ही मेट्रोशहरे, तसेच मध्यम स्वरुपाची व राज्यांच्या राजधानी असलेली शहरे हीचाईल्ड पोर्नोग्राफीसाठीची ह्णहॉटस्पॉटह्ण म्हणून गणली गेली आहेत. याचशहरांमध्ये कोरोना व्हायरसची लागण होण्याची प्रकरणे सध्या मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. या शहरांमध्ये बालशोषणाची प्रकरणे होऊ नये, म्हणूनआॅनलाईन दक्षता वाढविण्यासाठी संस्थेने सरकारी अधिका-यांना विनवणी केली आहे.चाइल्डलाइन इंडिया हेल्पलाइन च्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, तातडीची मदत व संरक्षण मागणारे 92,000 हून अधिक कॉल्स टाळेबंदीनंतरच्या 11 दिवसांत या हेल्पलाइनला आलेले आहेत. यावरून, टाळेबंदीच्या काळात लहान मुलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे भीषण सत्य समोर येते. लहान मुलांवर अत्याचार करणारे आणि लहान मुलांशी संबंधित अश्लील चित्रपट पाहण्याचे व्यसन असणारे  लाखोजण सध्या आॅनलाईन पद्धतीने आपली विकृती भागवत आहेत. त्यामुळे मुलांसाठी इंटरनेट हे माध्यम अत्यंत असुरक्षित बनले आहे. यावर कठोर कारवाई न झाल्यास, मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये तीव्र वाढ होऊ शकते. सध्याच्या टाळेबंदीच्या काळात त्यामुळे या शहरांतील लहान मुलांच्या जीवाला व सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे,याकडे भारतीय बाल संरक्षण निधीने (आयसीपीएफ) लक्ष वेधले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निदेर्शांचे आणि आपल्या राष्ट्रीय धोरणाचे हे उल्लंघन आहे. पोर्नोग्राफिक वेबसाइट्स त्यांच्या वेबसाइटची यूआरएल बदलूनभारतीय कायदा आणि न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवीत आहेत. भारत सरकारने तातडीने बाल अश्लीलतेवर कारवाई केली पाहिजे, तसेच बाल-लैंगिक अत्याचार सामग्रीविरूद्ध आंतरराष्ट्रीय धोरण ठरविण्यासाठी सर्व देशांशी चर्चा करायला पाहिजे, असे    ह्यआयसीपीएफह्णच्या प्रवक्त्या निवेदिता आहुजा यांनी स्पष्ट केले आहे. जिओ आणि एअरटेल यांसारखे इंटरनेट सेवा पुरवठादार आणि फेसबुक , ट्विटर , इंस्टाग्राम यांसारखे प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून बाल अत्याचारासंबंधी वेबसाईट्स प्रदर्शित झाल्यास, या कंपन्यांना त्याकरीता जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या  नायडू यांच्या अध्यक्षतेखालील राज्यसभा समितीने केली आहे. या शिफारसी तातडीने लागू करण्याची गरज आयसीपीएफह्णने व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :Puneपुणेsex crimeसेक्स गुन्हाonlineऑनलाइनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस