पुणे : वारजेतील कै. अरविंद बारटक्के दवाखन्यात झालेल्या कोरेाना टेस्टींग किट घोटाळयाबाबत पोलिसांनी पुणे महापालिकेला स्पटेंबर मध्ये पत्र पाठविले होते. त्यावर आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमली. पण पोलिसांनी पालिकेला हे पत्र पाठिवले आहे याची माहिती दस्तुदर खुदद अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांना दिली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान या चौकशी समितीचा अहवाल अदयाप आलेला नाही. त्यामुळे हा अहवाल येत्या आठ दिवसात येईल असेही बिनवडे यांनी सांगितले.
काेराेनाकाळात शासनाकडून महापालिकेला काेराेना तपासणीसाठी मिळालेल्या ‘रॅपिड अँटीजन किट’ प्रकरणात माेठा घाेटाळा उघडकीस आला आहे. वारजे येथील महापालिकेच्या डाॅ. अरविंद बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवर आलेल्या साडेअठरा हजार तपासणी किटपैकी ६० ते ८० टक्के किट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री करून त्याजागी तब्बल ११ हजारांहून अधिक बाेगस रुग्णांच्या नाेंदी केल्याचा व त्यांना एसएमएस जाऊ नये म्हणून रुग्णांऐवजी सेंटरवरील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांचे नंबर नाेंद केल्याचा धक्कादायक प्रकार लोकमत ने उघडकीस आणला आहे. त्याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांना विचारले असता ते म्हणाले मला दोन दिवसापुर्वी हा प्रकार समजला आहे. या प्रकरणासाठी पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशीष भारती यांनी चौकशी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल येत्या आठ दिवसात येणार आहे.
अहवालाला झाला उशीर
कोरेाना टेस्टींग किट घोटाळयाबाबत पोलिसांनी पुणे महापालिकेला २७ स्पटेंबर रोजी पत्र पाठविले आहे. त्यानंतर पालिकेने चौकशी समिती नेमली. पण या समितीचा अहवाल दोन महिने होउनही अदयाप आलेला नाही. त्यामुळे अहवाल जाणून बजून अदयापही का दिला नाही याबाबत पालिका वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.