पुणे : ‘त्याने ’ आधी पत्नीने खासगी भांडणातून फाशी घेतल्याचा बनाव केला. मात्र, विवाहितेच्या गळ्यावरील खुणांवरुन पोलिसांचा संशय बळावला. नंतर शवविच्छेदन अहवालामध्ये श्वास गुदमरल्याचे निष्पन्न झाले. आणि मग पोलिसांनी ‘ त्याच्या ’ कडे मोर्चा वळवत कसून चौकशी केली आणि खरे कारण उघड झाले. मूल होत नाही तसेच माहेरहून सोने आणत नसल्याने पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्वेनगर परिसरात मंगळवारी(दि.१९जुलै) दुपारी हा प्रकार घडला. रेश्मा हनुमंत कुऱ्हाडे (वय १९ रा. स्नेहांकित कॉलनी, कर्वेनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वारजे पोलिसांनी तिचा पती हनुमंत कुऱ्हाडे (वय २५) याला अटक केली असून सासु सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेश्माचा भाऊ लक्ष्मण वठुर (वय २२, रा. विजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. हनुमंत हा एका कंपनीत मोलमजुरीचे काम करतो़ लग्नानंतर तिला मुल होत नसल्याने तसेच माहेरच्या नातेवाईकांकडून सोन्याचे दागिने आणावेत यासाठी पतीसह सासू सासरे तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. रेश्मा यांनी बाहेर मजुरीचे काम करून पैसे जमा केले होते. तसेच रुमभाड्याचे पैसे तिने स्वत: कडे ठेवले होते़ हे पैसे द्यावेत या कारणावरुन मंगळवारी १७ जुलै रोजी पती हनुमंत याच्यासोबत भांडण झाले होते. वादातून त्याने रेश्माचा गळा दाबून खून केला़. खासगी रुग्णालयात भांडणातून तिने फाशी घेतल्याचा बनाव रचला़. रुग्णालयातील डॉक्टरांनी तशी माहिती पोलिसांना दिली़ मात्र, गळ्यावरील खुणांवरून पोलिसांना संशय आला़ शवविच्छेदनात श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले़ पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने गळा दाबून तिचा खुन केल्याचे कबुल केले़. पोलिसांनी पतीला अटक केली आहे़.
धक्कादायक..! मूल होत नसल्याने विवाहितेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 3:04 PM
मुल होत नसल्याने तसेच माहेरच्या नातेवाईकांकडून सोन्याचे दागिने आणावेत यासाठी पतीसह सासू सासरे विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते.
ठळक मुद्देकर्वेनगरमधील प्रकार : फाशी घेतल्याचा केला होता बनाव वारजे पोलिसांकडून पतीसह सासु सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल