पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या बाथरुम व बेडरुममध्ये स्पाय कॅमेरा लावण्यामध्ये एका डॉक्टराचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी एमडी डॉक्टरला अटक केली आहे.
सुजित आबाजीराव जगताप (वय ४२) असे अटक केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. या डॉक्टरांने स्पाय कॅमेरा बल्ब अमेझॉनवरुन मागवल्याचे तपासात समोर आले आहे. हा प्रकार ६ जुलै रोजी घडला होता. सुजित जगताप हे एमडी आहेत. त्यांचा हिराबाग येथे क्लिनिग आहे. ते भारती विद्यापीठ परिसरात एका हॉस्पिटलमध्ये लेक्चरला गेले होते.
याप्रकरणी एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टराने फिर्याद दिली होती. ही महिला डॉक्टर एका नामांकित महाविदयालयाशी संलग्न रुग्णालयात काम करते. ती रुग्णालयाच्या सर्व्हिस क्वार्टरमध्ये आणखी एका महिला डॉक्टरसह राहते. ती मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयातील काम उरकल्यावर फ्रेश होण्यासाठी रुमवर आली होती. यावेळी तिने बाथरुमची लाईट लावली असता ती सुरु झाली नाही. यानंतर बेडरुमची लाईटही सुरु झाली नाही. त्यामुळे तिने इलेक्ट्रिशिअनला बोलवले. त्याने दुरुस्ती करण्यासाठी बाथरुममधील बल्पचे होल्डर खोकल्यावर, आत स्पाय कॅमेरे, त्याचे मेमरी कार्ड आणि बॅकअप आढळला. यानंतर बेडरुमच्या बल्पचे होल्डर खोलले असता तेथेही असाच प्रकार आढळून आला. यानंतर तिने तातडीने धाव घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना गेल्या ४ दिवसांपासून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तसेच सुरक्षा रक्षक, फिर्यादी यांना संशय वाटत असलेल्यांकडे चौकशी करत होते. दरम्यान एका सीसीटीव्हीमध्ये डॉ. जगताप कैद झाले होते. त्यांना चौकशीसाठी बोलविल्यानंतर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.
पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी सांगितले की, सुजित जगताप हा न्यूरोलॉजिस्ट आहे. तांत्रिक विश्षलेणाद्वारे पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. आपण हे का केले हे अजूनही तो सांगत नाही.