शिक्रापूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक खळबळजनक आणि अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. पाबळ (ता. शिरूर )येथील स्मशानभूमी मध्ये एक काळी पिशवी त्यावर कोहळ्यावर,त्यावर पिन टोचून लावलेला मुलीचा फोटो आणि लिंबू, कुंकूसह इतर गोष्टी वाहिलेल्या आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाबळ (ता. शिरूर) येथे स्मशानभूमीत दशक्रिया विधीला आलेल्या नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला. हा प्रकार नेमका कोणी केला असेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पाबळच्या येथील एका आजीच्या दशक्रियेनिमित्त ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाबळ ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यासह निवृत्त जवान सुनील चौधरी व ग्रामस्थ महाराजांचे प्रवचन ऐकत होते. त्याचवेळी त्यांच्या पुढे दोन फूट अंतरावर वरील भोपळा इत्यादी साहित्य दिसले.मात्र, दशक्रिया होताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या नजरेत त्यांनी ही वस्तुस्थिती आणून दिली. यावेळी सर्वानाच हा प्रकार समजल्याने गोंधळ उडाला .यावेळी अनेकांनी या प्रकारावर भाष्य केले. मात्र,मुलीचा फोटो लावून स्मशानात असा प्रकार घडल्याचे दिसून आल्यावर भीती व्यक्त केली जात आहे.
सरपंच मारुती शेळके यांनी आजच्या विज्ञान युगात अजूनही अंधश्रद्धा पोसल्या जात असल्याचे वास्तव समोर आल्याची प्रतिक्रिया देताना यामागची भूमिका समजणे कठीण असल्याचे सांगून नागरिकांनी काही चुकीचे घडू नये यासाठी दक्ष राहावे. तसेच या प्रकाराबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन नागरिकांना केले आहे.
पुण्यातील राजकीय गुरुवर जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल सून पांढऱ्या पायगुणाची आहे, तिच्यामुळे तू आमदार मंत्री होणार नाही, असे सांगून त्यांचा संसार मोडण्यासाठी अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे दिसून आल्याने चतु:श्रृंगी पोलिसांनी ज्योतिषाचार्य रघुनाथ येमूलला अटक केली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरात गेल्या साडेतीन वर्षात जादूटोणा कायद्यान्वये आतापर्यंत तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत. या ११ गुन्ह्यात तब्बल ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.