शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात सापडला १८०० कोटी रुपयांचा ड्रग्स साठा; गुजरात ATS अन् कोस्ट गार्डला मोठं यश
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक; भारताच्या विनंतीवरून कारवाई: रिपोर्ट्स
3
"बॉम्बने त्याची गाडी उडवून देऊ", सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
4
"पप्पा, प्लीझ मला फोन घेऊन द्या ना..."; आधी सासऱ्याकडे केला हट्ट, नंतर सासूसोबत पळाला जावई
5
अखेर काय आहे ट्रम्प यांचा प्लान? आता यू-टर्न घेत म्हटलं, "कोणीही सूटणार नाही, सर्वच देश निशाण्यावर..."
6
पवन कल्याण यांच्या पत्नीनं तिरुमाला मंदिरात संपूर्ण केस दान केले; काय आहे कारण?
7
मुलावर वशीकरण करून सासूने पळवून नेले, जाताना...; सासू-जावई लव्ह स्टोरीत नवा ट्विस्ट 
8
अवैध बोअरवेलमधून पाणी घेणे पापापेक्षा कमी नाही, पाण्यासाठी हाहाकार माजेल -उच्च न्यायालय
9
Astro Tips: इच्छापूर्ती वा आर्थिक अडचणीतून सुटकेसाठी चार सोमवार करा 'हे' सोपे उपाय!
10
लहान मुलावर लाईट कोसळली अन्...; 'गुड बॅड अग्ली' सिनेमाच्या शोदरम्यान घडली दुर्दैवी घटना
11
बिग बींनी ट्वीट करत विचारली फॉलोवर्स वाढवायची ट्रिक, चाहत्याने सांगितला भन्नाट उपाय, म्हणाला- "रेखासोबत..."
12
'भारताच्या सर्जनशीलतेची  अवघ्या जगाला भुरळ', ‘लोकमत सूर ज्योत्स्ना नॅशनल म्युझिक अवॉर्ड’मध्ये प्रेक्षक मंत्रमुग्ध
13
'भारतीय औषध कंपनीवर रशियाने केला मुद्दाम हल्ला'; नव्या हल्ल्यात ३२ जण ठार
14
रणबीर कपूरने 'हायवे'च्या प्रमोशनपासून दूर ठेवलेलं? रणदीप हुडा म्हणाला, "हो, मलाही तेच वाटलं..."
15
FD वर मिळतंय ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, 'या' बँका देताहेत जबरदस्त इंटरेस्ट रेट 
16
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२५: प्रवास होईल, आर्थिक लाभ होईल, अविवाहितांचे विवाह ठरतील!
17
IPL 2025: ऋतुराज गायकवाडच्या जागी CSK मध्ये १७ वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे; किती पैसे मिळणार?
18
केवळ ४ वर्षांपर्यंत जमा करावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळेल १ कोटींचं बेनिफिट; जाणून घ्या LIC च्या स्कीमबाबत
19
४०१ जणांनी १० तास केली मोजणी; बांगलादेशातील 'या' मशिदीला भरभरून दान, फक्त २४ तासांत...
20
Tarrif War: भारत निर्यातीत बनणार ‘दादा’, लाखो नव्या नोकऱ्या निर्माण होणार

अल्पवयीन मुलाकडून तरुणावर गोळीबार, गोळी खांद्याच्या आरपार; तळेगाव दाभाडेतील घटनेने खळबळ

By नारायण बडगुजर | Updated: April 24, 2024 11:38 IST

तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळी येथे मंगळवारी (दि. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली...

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाने तरुणावर गोळीबार केला. यात गोळी तरुणाच्या खांद्याच्या आरपार गेली. तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळी येथे मंगळवारी (दि. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली.

आदित्य गणेश भेगडे (२७, रा. भेगडे आळी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ), असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य भेगडे याचे एका अल्पवयीन मुलासोबत सहा महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. तसेच अल्पवयीन मुलाचा विरोधक असलेल्या एका तरुणाच्या वडिलांसोबत आदित्य फिरायचा. तसेच त्यांच्या घरी त्याचे येणे-जाणे असायचे. त्यामुळे देखील अल्पवयीन मुलाला आदित्य याच्याबाबत राग होता. त्यातून त्यांच्यामध्ये सोशल मीडियातून देखील एकमेकांना खुन्नस दिली जात होती. 

दरम्यान, आदित्य हा त्याच्या राहत्या घरासमोर मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीवर बसून मोबाइलमध्ये गेम खेळत होता. त्यावेळी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांसोबत तेथे आला. आदित्य याच्याजवळ येऊन अल्पवयीन मुलाने त्याच्याकडील पिस्तुलातून आदित्य याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी आदित्य याच्या खांद्याच्या आरपार गेली. त्यानंतर १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि त्याचे दोन अल्पवयीन साथीदार तेथून पळून गेले. 

खांद्याला गोळी लागल्याने जखमी झालेला आदित्य हा स्वत: तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अल्पवयीन मुलांचा शोध सुरू आहे. 

दोघांवरही गुन्हे दाखल 

गोळीबार करणारा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि जखमी झालेला आदित्य भेगडे हे दोघेही पोलिस रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :FiringगोळीबारTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसCrime Newsगुन्हेगारी