शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

‘शूटिंग पॉइंट’ बंद होणार?

By admin | Published: June 29, 2015 6:37 AM

घाटमाथ्यावरील खंडाळा या निसर्गरम्य ठिकाणावरील पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र असलेला शूटिंग पॉइंट बंद होण्याच्या मार्गावर आहे.

विशाल विकारी, लोणावळाघाटमाथ्यावरील खंडाळा या निसर्गरम्य ठिकाणावरील पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र असलेला शूटिंग पॉइंट बंद होण्याच्या मार्गावरून असून, या ठिकाणी खासगी सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून पर्यटकांची अडवणूक करण्याचे प्रकार मागील आठवडाभरापासून सुरू झाले आहेत़मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील शेकडो चित्रपट व मालिकांचे शूटिंग याच पॉइंटवर करण्यात आले आहे़ ‘आती क्या खंडाला’ या गुलाम चित्रपटातील गाण्यालाही याच निसर्गरम्य ठिकाणाची पार्श्वभूमी आहे. या ठिकाणावरून राजमाची व्हॅली व कर्जतच्या निसर्गरम्य परिसराचे समग्र दर्शन होते. जवळील डोंगरामधून फे साळत वाहणारे धबधबे पर्यटकांना मोहिनी घालतात़ अनेक वर्षांपासून पर्यटकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या या ठिकाणावर लोणावळा नगर परिषदेने ‘नेचर झोन’ हे आरक्षणही टाकले आहे़ मात्र ही जागा अद्याप ताब्यात घेण्यात न आल्याने जागामालकांनी या पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गावर गेट बसवून सुरक्षारक्षक नेमले आहेत़ मागील आठवड्यात या सुरक्षारक्षकांनी पर्यटकांना पॉइंटवर जाण्यास मज्जाव केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता़ पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद पोहोचल्याने पर्यटकांना या ठिकाणी जाण्यास मुभा देण्यात आली़वास्तविक, लोणावळा व खंडाळा ही जन्मजात पर्यटनस्थळे आहेत़ पर्यटनस्थळे म्हणूनच या शहरांचा उगम झाला आहे़ विविध राज्यांसह जगभरातील पर्यटक या शहरांना भेट देत असतात़ लोणावळा व खंडाळा या शहरांचे अर्थकारण हे पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे़ असे असताना यापूर्वीही सुरक्षेच्या कारणावरून वलवण धरण व गार्डन पर्यटकांना बंद करण्यात आले़ नगर परिषदेचे आरक्षण असलेली लोणावळा धरणाची चौपाटी मूळ मालकांनी सुरक्षाजाळी लावून पर्यटकांसाठी बंद केली़ भुशी धरणापेक्षाही जास्त प्रसिद्ध असलेला सत्यम-शिवम् धबधबाही मालकीच्या वादात बंद करण्यात आला़ भुशी धरण, लायन्स पॉइंट ही ठिकाणे नगर परिषद हद्दीबाहेर आहेत़ पर्यटन केंद्र अशा प्रकारे बंद होऊ लागल्यास पर्यटन व पर्यायाने शहराच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होणार आहे़ शूटिंग पॉइंट या डोंगरकड्याची मालकी कोणाचीही असली, तरी गत १०० वर्षांपासून हे ठिकाण पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे़ नागरिक व प्रशासनाने एकत्र येत ही स्थळे खुली ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत़शूटिंग पॉइंट या जागेवर नगर परिषदेचे नेचर झोनचे आरक्षण असले, तरी सदर जागा अद्याप जागेचा मोबदला देऊन ताब्यात घेण्यात आलेली नाही़ त्या जागेची मालकी मूळ मालकाकडेच आहे़ मात्र अशा प्रकारे पर्यटनस्थळ बंद करणे योग्य नाही. याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात येतील़ - गणेश शेटे़, मुख्याधिकारी मागील १०० वर्षांहून अधिक काळापासून पर्यटकांचे खंडाळ्यातील मुख्य आकर्षण केंद्र असलेल्या शूटिंग पॉइंटची जगभरात ओळख आहे़ डोंगराच्या पठारावरील या भागातून निसर्गरम्य परिसर व धबधबे पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात़ शहराचे अर्थकारणदेखील पर्यटनावर अवलंबून आहे. असे असताना कोणी हे पर्यटनस्थळ बंद करण्याचे कारस्थान करणार असेल, तर आम्ही ते होऊ देणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू. - मच्छिंद्र खराडे़, जिल्हाप्रमुख, शिवसेना