वीकेंडच्या पहिल्या लॉकडाऊननंतर सकाळी आठ वाजल्यापासून दुकाने खुली झाली. मात्र, ग्राहकांअभावी दुकानदारांची काहीशी निराशा झाली. दुपारनंतर अनेक दुकानदारांनी शटर अर्ध्यावर आणून ठेवले होते. मात्र, दुपारनंतर गुढीपाडव्याची खरेदी करण्यासाठी सायंकाळी नागरिकांनी गर्दी केली होती. हडपसर मुख्य बाजारपेठेत खरेदीदारांमध्ये कमालीची नाराजी दिसत होती. गुढीपाडव्यानिमित्त स्वीटहोममध्ये तर रस्त्यावर गुढी उभारण्यासाठी काठी घेण्यासाठी नागरिक दिसत होते. दोन दिवसांच्या बंदनंतर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होईल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, तो फोल ठरल्याचे कॅम्प परिसरातील दुकानदारांनी सांगितले.
हडपसर आणि परिसरामध्ये पोलिसांच्या भीतीने सर्वच दुकानदारांनी दुकाने बंद केली. काहींनी प्रतिप्रश्न केला की, लगेच पाच हजार रुपयांची पावती केली जात होती, त्यामुळे दुकानदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. वीकेंडला दोन दिवसांचा लॉकडाऊन होता.
गुढी पाडव्यानिमित्त खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येतील, अशी आशा दुकानदारांना होती. मात्र, कपड्याच्या दुकानात कुठेही गर्दी दिसत नव्हती. तर सराफा बाजार सोमवारी बंद होता. तसेच स्टेशनरी-कटलरी दुकानांमध्ये काही ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. पायताणाच्या आणि फर्निचरच्या दुकानात एकही ग्राहक फिरकला नसल्याने अनेक दुकानदारांनी सांगितले. चप्पलचे दुकानदार म्हणाले की, स्वच्छता करण्यासाठी दुकान उघडले आहे. ग्राहक फिरकले नाही.