सासवडच्या धर्तीवर ठराविक वेळेत ठराविक व्यावसाय सुरू ठेवावेत, असे आवाहन पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी गुरुवारी नीरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात केले होते. त्या अनुषंगाने शुक्रवार दि. १६ एप्रिल रोजी सकाळी नीरा ग्रामपंचायतीच्या सभागृहात व्यापाऱ्यांची बैठक सरपंच तेजश्री काकडे यांनी बोलवली होती. यावेळी उपसरपंच राजेश काकडे, सदस्य अनिल चव्हाण, संदीप धायगुडे, अनंता शिंदे, अभिषेक भालेराव, सारिका काकडे, वैशाली काळे, राधा माने, माजी उपसरपंच विजय शिंदे, निरेचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागार, मांडलाधिकारी संदीप चव्हाण, ग्रामसेवक मनोज डेरे, व्यापारी आदी उपस्थित होते. किराणा व्यापारी, भाजीपाला, फळ विक्रेते, हॉटेल, वडापाव, स्वीट मार्ट चालक, मटण, मच्छी विक्रेते, मेडिकल, शेतीपूरक व्यावसायिक व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून दूध वगळता इतर सर्व दुकाने सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अत्यावश्यक आस्थापने सुरू राहणार आहेत. त्या दुकान मालकांसह कामगारांची कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. कोरोनाचे अहवालबाधित आल्यास ती दुकाने शासनाच्या नियमाप्रमाणे काही दिवस बंद ठेवावीत, त्याला कोणत्याही व्यावसायिकांनी विरोध करू नये.
राजेश काकडे : उपसरपंच, नीरा ग्रामपंचायत
नीरा ग्रामपंचायतीच्या सभागृहात व्यापारी, ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक झाली.