आळेफाटा : आळेफाटा येथे गॅरेज समोर कामासाठी उभ्या असेल्या मालवाहतूक ट्रकला रात्रीच्या सुमारास अचानक शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. हि घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की, आळेफाटा येथे एका गॅरेजसमोर एक सहा चाकी मालवाहतूक ट्रक कामासाठी उभा होता. शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास गाडीने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती समजतात गॅरेज व्यावसायिक यांनी तात्काळ धाव घेत पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे जळाला. दरम्यान चारच दिवसांपुर्वी आळेफाटा बायपासला धावत्या कंटेनरचा टायर फुटुन लागलेलल्या आगीत कंटेनर मधील लाखो रुपयांचे स्पेअर पार्ट जळाले होते. तर मागील महिन्यात बारा चाकी गाडीने अचानक पणे पेट घेतल्याने जळुन खाक झाली होती. आग लागण्याच्या घटना ताज्या असताना शनिवारी रात्री पुन्हा वाहन पेटण्याची घटना घडलेली. आळेफाटा परिसरात गेल्या वर्षभरात सात ते आठ वाहने जळीताच्या घटना घडल्या असुन या ठिकाणी मोठी बाजार पेठ, अनेक दवाखाने असुन आळेफाटा परिसरात स्वतंत्र अग्निशमन वाहनाची व्यवस्था करावी अशी मागणी येथील व्यावसायिक, नागरिक करत आहे.