पुणे : पुण्यातील हाॅस्पिटलमध्ये अवयवय प्रत्याराेपणाचे वाढलेले प्रमाण आणि खासगी रक्तपेढ्यांकडून विविध प्रकारचे अमिष दाखवून केले जाणारे रक्तदान या कारणामुळे पुण्यात काही रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हाॅस्पिटलला अटॅच असणाऱ्या रक्तपेढ्यांना जरी रक्ताचा तुटवडा जाणवत नसला तरी खासगी रक्तपेढ्यांमुळे हाॅस्पिटलच्या रक्तपेढ्यांचा रक्तदाता कमी झाल्याचे दिसून येत आहे.
पुण्यात माेठमाेठे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल्स आहेत. त्यांच्याकडे यकृत, ह्रदय आणि किडणी प्रत्याराेपणाच्या शस्त्रक्रिया हाेतात. यामध्ये ज्युपिटर, जहांगीर, सह्याद्री, पुना हाॅस्पिटल, दीनानाथ मंगेशकर अशा हाॅस्पिटलमध्ये अवयव प्रत्याराेपण शस्त्रक्रिया हाेतात. एका प्रत्याराेपण शस्त्रक्रियेसाठी २० रक्तपिशव्या रक्त लागते. दिवसातून अशा पाच अवयव प्रत्याराेपण शस्त्रक्रिया झाल्या तरी त्यासाठी १०० रक्तपिशव्या जातात. त्यामुळे तुटवडा हाेत असल्याचे दिसून येते.
पुण्यात ३२ रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी काही खासगी रक्तपेढी आहेत तर काही हॅस्पिटलशी निगडित आहेत. यापैकी ज्या हाॅस्पिटलसाेबत निगडित आहेत त्या रक्तदात्यांना अमिष न दाखवतात रक्तदान घेतात. तसेच त्या बाहेर रक्तदान शिबिरेही घेतात आणि त्यांची रक्ताची गरज भागवतात. परंतू, ज्या खासगी रक्तपेढ्या आहेत त्या बाहेर जाउन खासकरून ग्रामीण भागात जाऊनही घेतात व बाहेर म्हणजेच्या राज्याच्या बाहेर नेऊन विकतात. आता हे रक्त पुण्यातच राहायला हवे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज हाॅस्पिटलमधील रक्तपेढ्यांनी व्यक्त केली.
खासगी रक्तपेढ्यांकडून विमा, हेल्मेट, पेनड्राईव्ह चे अमिष-
ज्यावेळी रक्तदाता रक्तदान करताे त्यावेळी त्याच्याकडून पाच रक्तघटक तयार हाेतात. यामध्ये रक्तपेशी, प्लाझमा, क्रायाे आदी घटकांचा समावेश असताे. म्हणजे एक रक्तदात्यापासून त्यांना जवळपास अडीच ते तीन हजारांचा नफा मिळताे. त्यासाठी या खासगी रक्तपेढया मग रक्तदात्यांना विमा, हेल्मेट, पेनड्राईव्हचे अमिष दाखवून रक्तदानाद्वारे रक्त घेतात आणि ते मग बाहेरच्या राज्यात जसे छत्तीसगड येथे व्यावसायिक दराने विक्री केली जाते, अशाही तक्रारी करण्यात येतात.
अवयव प्रत्याराेपण आणि घटलेली शिबिरांची संख्या यामुळे पुण्यात रक्तपेढयांमध्ये तुटवडा आहे. ताे दुर करण्यासाठी एफडीएने मुंबईला जसे शिबिर वाटून दिले तसे पुण्यातील रक्तपेढ्यांनाही सिस्टिम बसवून द्यायला हवी. प्रत्येक रक्तपेढ्यांना कँप वाटून देण्याचे काम एफडीएने करायला हवे. तसेच, इतके शिबिरे हाेतात की हेल्मेट, पेनड्राईव्ह घेउन करतात त्यांच्यावर कारवाई देखील करायला हवी.
- राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट