शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

Blood Shortage: पुण्यात रक्ताचा तुटवडा...! दहा दिवसांपासून रक्तदान शिबिरही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 9:17 AM

शहरामध्ये डेंग्यू आणि मलेरियासारख्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने त्यांना रक्तातील आरडीपी व एसडीपीसारख्या घटकांची मोठी गरज

पुणे : दिवाळी सण आणि त्यानंतर असणाऱ्या सुट्या यामुळे विविध संस्थांकडून या काळात रक्तदान शिबिर घेण्याचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे गेल्या दहा दिवसांमध्ये एखादा अपवाद वगळता एकही रक्तदान शिबिर पुण्यात झाले नाही. त्यामुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याची माहिती रक्ताचे नाते ट्रस्टचे संचालक राम बांगड यांनी दिली.

बांगड म्हणाले, पुण्यामध्ये दररोज सुमारे एक हजार चारशे बॅॅग रक्ताची गरज असते. मात्र, गेल्या १० दिवसांत अपवाद वगळता रक्तदान शिबिर झाले नाही. त्यामुळे सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे शहरामध्ये डेंग्यू आणि मलेरियासारख्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने त्यांना रक्तातील आरडीपी व एसडीपीसारख्या घटकांची मोठी गरज असते.

एका रुग्णालयात एका रक्तपिशवीतून अगदीच तुटक आरडीपी व एसडीपी घटक मिळतात. त्यामुळे त्यांची गरज भागविण्यासाठी चार पिशव्यांतील रक्तातील घटक एकत्र करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे सध्या डेंग्यू व मलेरिया रुग्णांच्या नातेवाइकांची रक्त शोधण्यासाठी धावपळ सुरू आहे.

 सरकारी रुग्णालयात करा रक्तदान

शहरामध्ये ससून आणि पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात सरकारी रक्तपेढी आहे. अन्य रक्तपेढ्यांची नोंदणी जरी धर्मादाय कार्यालयात झाली असली तरी गरीब रुग्णांना परवडेल अशा किमतीत रक्त दिले जात नाही. रक्त विक्रीचा व्यवसाय केला जातो. त्यामुळे नागरिकांनी रक्तदानासाठी सरकारी रक्तपेढ्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही राम बांगड यांनी केले. ''ए पॉझिटिव्ह रक्तगटाची सध्या एकही पिशवी नाही. इतर गटांचे रक्तसुद्धा पुरेसे नाही. प्लेटलेट्सच्या पिशव्याही नाहीत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा स्पष्ट जाणवतो आहे. दिवाळीनंतर रक्तदान शिबिर कमी झाल्याने हा तुटवडा तीव्रतेने जाणवत असून, रक्तदान शिबिरे वाढविण्याची गरज आहे. -डॉ. सोमनाथ खेडकर, ससून रुग्णालय.''

''गेल्या सहा दिवसांमध्ये छोटी-छोटी शिबिरे झाली. त्यामुळे बऱ्यापैकी पिशव्या जमा झाल्या आहेत. दिवाळीच्या दिवसांत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या मोठ्या आयटी इंडस्ट्रीत वर्क फ्राॅम होम कल्चर सुरू असल्याने मोठे शिबिर हाेत नाहीत. -किशोर धुमाळ, जनसंपर्क अधिकारी, केईएम रक्तपेढी.'' 

टॅग्स :PuneपुणेBlood Bankरक्तपेढीHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर