अभिजित कोळपे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला (सारथी) स्वायतत्ता दिली आहे. त्यामुळे तारादूत भरती सारथीनेच करायला हवी, अशी मागणी मराठा संघटनांनी केली आहे. तर शासनाच्या परवानगीनेच तारादूतांची भरती करण्यात येणार आहे. ७१६ तारादूत भरण्याचा प्रस्ताव राज्याच्या उच्च स्तरीय समितीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला असल्याचे सारथीने स्पष्ट केले आहे. मात्र, त्यामुळे मराठा संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे.
प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय विभागांनी शक्य असेल तेथे पदनिमिर्ती न करता संबंधित कामे बाह्ययंत्रणेमार्फत काम करून घेण्या संदभार्त संदर्भ क्र. १ तर संदर्भ क्र. २ नुसार मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे त्या डावलून तारादूतांची भरती करता येत नाही. त्यामुळे शासनाच्या नियम, सूचनांचे पालन सर्व संबधितांनी करावे. अन्यथा संबधितांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश आहेत, असे सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी स्पष्ट केले आहे.
कोट
सारथीला स्वायतता दिली आहे. त्यांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घ्या, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोचार् समन्वयक यांच्यामध्ये झालेला बैठकीत सारथी संचालकांनी तारादूंताना सामावून घ्यावे, असते ठरले होते. मात्र, तरीही सारथीने तारादूतांचा प्रस्ताव मंजुरीसाठी हायपर समितीकडे पाठवला आहे. त्यामुळे दोन वषार्पासून रखडलेला तारादूत भरतीचा प्रश्न पुन्हा रखडणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरूणांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
- सचिन आडेकर, अध्यक्ष, मराठा सेवा संघ, पुणे शहर
-------
कोट
सन २०१३ चा राज्याच्या वित्त विभागाचा बाह्य स्वरूपातील लोकांच्या भरती संदभार्त आदेश आहे. अशा प्रकारची भरती करताना शासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे शासनाच्या नियमावलीनुसार काम करावे लागते. त्यांच्या परवानगीशिवाय तारादूतांची भरती केल्यास उद्या त्यावर अनियमिततेचा ठपका लागू शकतो. त्यामुळे नियुक्त केलेल्या तारादूतांना पुन्हा काढावे लागेल. त्यामुळे आपण शासनाच्या नियमानुसार योग्य कार्यवाही करत आहे. ७१६ तारादूत भरण्याचा प्रस्ताव उच्च स्तरीय समितीकडे पाठवला आहे. त्यांची रितसर परवानगी आल्यास आपण तत्काळ भरती करणार आहोत.
- अशोक काकडे, व्यवस्थापकीय संचालक, सारथी