शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

... शो मस्ट गो ऑन !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 11:53 AM

वय वर्षे ४२... कर्करोगाशी सुरू असलेली कडवी झुंज... त्याचवेळी रंगमंचावर बहरत असलेली कारकीर्द...

ठळक मुद्दे कर्करोगाशी झुंज : आजाराशी दोन हात करत जिद्दी कलाकाराची रंगभूमीकडे झेप एखाद्या चित्रपटात शोभणारे हे दृश्य!

प्रज्ञा केळकर-सिंग- पुणे : ‘बाबु मोशाय, हम सब तो रंगमंच की कठपुतलिया है’ असं म्हणत राजेश खन्ना आयुष्याचं गणित किती सहजतेने उलगडून सांगतात! आयुष्याचा रंगमंच असो की नाटकाचा... प्रत्येकाने आपली भूमिका खुबीने वठवलीच पाहिजे, असं सांगणारा ४२ वर्षांचा ‘लढवय्या’, हरहुन्नरी संतोष ढेबे हा कलाकारही तितकाच भावतो. वय वर्षे ४२... कर्करोगाशी सुरू असलेली कडवी झुंज... त्याचवेळी रंगमंचावर बहरत असलेली कारकीर्द... एखाद्या चित्रपटात शोभणारे हे दृश्य! मात्र, प्रत्यक्षात असा अवलिया रंगमंचावर अवतरतो तेव्हा ‘रडायचं नाही... लढायचं’ याची शब्दश: प्रचिती येते.संतोष ढेबे यांनी आपल्या सकारात्मकतेतून, कलेप्रती असलेल्या प्रेमातून असाच आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये आज (गुरुवार) भरत नाट्य मंदिर येथे ढेबे यांची भूमिका असलेले ‘आवर्त’ हे नाटक सादर होत आहे. दुसºया टप्प्यावर त्यांना कर्करोगाचे निदान झाले आणि ताबडतोब शस्त्रक्रियाही करावी लागली. सध्या केमोथेरपीचे उपचार सुरू आहेत. केमोथेरपीच्या आठ सायकलपैकी तीन सायकल पूर्ण झाल्या आहेत. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर उपचार सुरू असतानाही त्यांनी रंगभूमीविषयी जपलेली आपुलकी सकारात्मकतेची साक्ष देणारी ठरत आहे. संतोष ढेबे यांच्या या जिंदादिलीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.सरकारी कर्मचारी असलेले ढेबे पहिल्यापासूनच नाटकात, वाचनात रमतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून ते एकांकिका तसेच नाटकांमध्ये हौशी कलाकार म्हणून कार्यरत आहेत. सर्व काही सुरळीत चाललेले असताना सप्टेंबर महिन्यात अचानक तब्येतीचा त्रास सुुरू झाला म्हणून पत्नीसह ते डॉक्टरकडे गेले. सर्व तपासण्या झाल्यावर ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. आयुष्यच उद्ध्वस्त झाले, या भावनेने त्यांच्या मनात घर केले. आई, पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा परिवार. आजाराचे संकट कोसळल्याने सर्वजणच खचले. ‘सगळं संपलं’ असे वाटत असतानाच कलेने आशेचा किरण दाखवला. शस्त्रक्रिया झाल्यावर काही दिवसांमध्येच आशुतोष नेर्लेकर यांचा फोन आला आणि त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत काम करण्याविषयी विचारणा केली. त्यांना आजाराबाबत काहीच कल्पना नव्हती. ढेबे सर्व काही मोकळेपणाने बोलले आणि लगेच होकार दिला..........अनेक नाटकांत संतोष ढेबे यांनी केली भूमिका४संतोष ढेबे यांनी यापूर्वी ‘नटसम्राट’ या नाटकामध्ये विठोबा आणि कळवणकर या भूमिका साकारल्या आहेत. ‘योगीराज’ या नाटकामध्ये स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. ४महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये राजमुद्रा संशोधन आणि विकास केंद्राच्या ‘आवर्त’ या नाटकामध्ये ते पोलीस अधिकाºयाची भूमिका बजावत आहेत. नाटकाचे लेखन अनिरुद्ध रांजेकर यांनी केले असून, दिग्दर्शन आशुतोष नेर्लेकर यांचे आहे............४‘लोकमत’शी बोलताना ढेबे म्हणाले, नैराश्याने ग्रासले ते केवळ पहिल्या दिवशीच. दुसराच दिवस कमालीची सकारात्मकता घेऊन आला. कलाच आपल्याला जगवेल, आयुष्याकडे आशावादी दृष्टीने पाहायला शिकवेल याची खात्री पटली. ४रंगभूमीशी नाते तोडायचे नाही, किंबहुना अधिक घट्ट करायचे, ही कल्पना पत्नीला बोलून दाखवली. तिने तत्काळ होकार दिला आणि पाठिंबाही. ४नाटकाचा सराव सुरू झाल्यापासून पत्नी स्वत: मला घ्यायला आणि सोडायला येते. माझे पथ्यपाणी, औषधे आदींची काळजी घेते. नाटकाने मला नव्या उमेदीने उभे राहण्याचे बळ दिले.

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकcancerकर्करोग