पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या स्वेटरचा दर्जा व किंमत यामध्ये तफावत असल्याच्या तक्रार आल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाचे प्रमुख बबन दहिफळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले आहे.शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी वुलनचे स्वेटर पुरविण्याचा ठेका देण्यात आला होता. त्यासाठी एका स्वेटरसाठी सरासरी ४०० रूपयांचा दर देण्यात आला. मात्र वुलनचे स्वेटर न पुरविता ठेकेदाराने सिंथेटिकचे स्वेटर दिले आहेत, त्याची किंमत बाजारामध्ये खूपच कमी असल्याची तक्रार विनायक फडके यांनी महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली होती. कुमार म्हणाले, ‘स्वेटरच्या खरेदीची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची नव्याने सुनावणी घेण्यास सांगण्यात आले आहे.
शिक्षणप्रमुखांना कारणे दाखवा
By admin | Published: March 17, 2016 3:22 AM