पुणो : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) सदाशिव पेठेतील मे. डी. विजय फार्माच्या संचालकांना परवाना का रद्द करु नये, अशी नोटीस बजावल्याची माहिती एफडीएचे सहायक आयुक्त एस. एस. मोहिते यांनी सोमवारी दिली. बोगस बिल तयार करुन किडनीच्या आजारावरील औषधांची विक्री केल्याप्रकरणी विजय फार्माच्या संचालकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
कोथरुड येथील संजीवन शाश्वत मेडिकलच्या नावे चलन बनवून औषधाची विक्री करण्यात आली होती. मात्र तपासणीत असे दुकानच नसल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी मे. डी. विजय फार्मा लिमिटेडचे संचालक राजेंद्र दिनानी, विजय दिनानी, विजय फार्माचे शाखाप्रमुख सैफन मेहबुब नदाफ, फार्मासिस्ट चारुशीला सुरेश थोरात, विजय फार्मा लिमिटेड व रेनॉन हेल्थकेअर, सत्यजीत शंकर मंडल यांच्या विरोधात विश्रमबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
कायद्यानुसार घाऊक औषध विक्रेत्यांना परवानाधारक विक्रेता अथवा डॉक्टरांना विक्री बिलानेच औषध पुरवठा करणो बंधनकारक आहे. डॉक्टरांनी रुग्णांना परस्पर उत्पादन कंपनीच्या एजंटकडून औषध घेण्यास सुचवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या पाश्र्वभूमीवर औषध विक्रेत्यांच्या नियमित तपासणीत देखील विक्री चलनाची कसून तपासणी करण्यात येणार आहे.