शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

कोथरूडमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले ; मध्यरात्रीची घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 3:44 PM

कोथरूड येथील पौड रस्त्यावरील उजव्या भुसारी कॉलनीजवळ प्रवाशाला लुटण्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या संदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे. 

पुणे : कोथरूड येथील पौड रस्त्यावरील उजव्या भुसारी कॉलनीजवळ प्रवाशाला लुटण्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या संदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे. याबाबत सचिन नाईक यांनी फिर्याद दिली आहे. नाईक हे मुंबई येथून पत्नीला भेटून परतले. येताना ते चांदणी चौकात उतरले. त्यावेळी त्यांनी लोहिया जैन आय टी पार्कजवळून  एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. संबंधित दुचाकीवर चालक आणि अजून एक व्यक्ती बसली होती मात्र तरीही त्यांनी नाईक यांना राहुल कॉम्प्लेक्सपर्यंत लिफ्ट दिली.  त्यानंतर  पाठीमागून  एका दुचाकीवरून तीन व्यक्ती आल्या आणि त्यांनी नाईक यांना कोपऱ्यात नेवून मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक सुरु झालेल्या या मारहाणीनंतर फिर्यादी गोंधळून गेले होते. त्यावेळी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून मोबाईल, पैसे आणि मौल्यवान सामान काढून घेत पोबारा केला.  यात सुमारे ८ हजार ५०० रुपयाचा ऐवज काढून घेण्यात आला. त्यानंतर कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल  करण्यात आली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ अधिक तपास करत आहेत. दरम्यान चांदणी चौकातून रात्री उशिरा अनेक प्रवाशांची मुंबईला ये -जा सुरु असते. यापूर्वीही धाक दाखवून लुटणारीच्या घटना तिथे घडल्या आहेत. एखादा गंभीर प्रकार होण्याची वाट न बघता चौकात एखादी पोलीस चौकी सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkothrudकोथरूडRobberyदरोडा