आंबेगाव तालुक्यात काठापूर बुद्रुक, शिंगवे, महाळुंगे पडवळ, वडगाव काशिंबेग या ठिकाणी बैलपोळा साजरा झाला. काठापूर बुद्रुक या ठिकाणी बैलांची पूजा करून बैलपोळा सण साजरा करण्यात आला. सध्या बैलांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. बैलगाड्याचा शौकीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरीच सध्या बैल दिसत आहेत. त्यामुळे खूप कमी शेतकरी कुटुंबाकडे बैल आहेत. शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने बैलांची गरज कमी झाली व पर्यायाने शेतीसाठी वापरायचे बैल कमी झाले. बैलगाडा शर्यतीसाठी अनेक शेतकरी बैल सांभाळायचे; परंतु बैलगाडा गेल्या सात वर्षांपासून बंद असल्याने या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बैल विकून टाकले आहेत. त्यामुळे ठराविक शेतकऱ्यांकडेच बैल दिसतात. बैल सध्या ग्रामीण भागातही दुर्मीळ प्राणी झाल्याचे दिसून येत आहे. आंबेगाव तालुक्यात बैलांची पूजा करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून बैल पोळा साजरा करण्यात आला.
आंबेगाव तालुक्यात श्रावणी बैलपोळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:14 AM