शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

चित्रसृष्टीलाही श्रावण महिन्याची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 3:18 AM

‘घन घन माला नभी दाटल्या’, ‘श्रावणात घन निळा बरसला’, ‘रिमझिम झरती श्रावणधारा’, ‘ॠतू हिरवा, ॠतू बरवा’ अशी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘घन घन माला नभी दाटल्या’, ‘श्रावणात घन निळा बरसला’, ‘रिमझिम झरती श्रावणधारा’, ‘ॠतू हिरवा, ॠतू बरवा’ अशी गाणी कानावर पडली की श्रावणाचे सौैंदर्य आपोआपच डोळ््यांसमोर खुलते. श्रावण महिन्याच्या आगमनाने अवघी सृष्टी हिरवागार शालू नेसून स्वागताला उभी ठाकते. श्रावणाचे हेच सौंदर्य आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व यापासून चित्रपटसृष्टी तरी कशी वेगळी राहू शकते. गेल्या अनेक दशकांपासून श्रावणी सोमवार, श्रावणातील सण, उत्सव आणि नैसर्गिक महत्त्व यावर आधारित अनेक चित्रपट मराठीमध्ये येऊन गेले आहेत.कृष्णधवल सिनेमांच्या काळापासूनच मराठी समाजमनावर असलेला धार्मिकतेचा पगडा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आला आहे. श्रावणातील सोमवारचे व्रतवैकल्य केल्यामुळे घरातील अडचणी, संसारातील विघ्न दूर झाल्याचे कथानक असो वा श्रावणामध्ये घरामधील वयोवृद्ध तीर्थाटनासाठी घराबाहेर पडल्याची दृश्ये असोत श्रावणाशी संबंधित एक तरी गोष्ट सिनेमामध्ये असायचीच. त्याशिवाय प्रेक्षकांनाही सिनेमा आपलासा वाटत नसायचा. अलीकडच्या काळात हे चित्र बदलत चालले असले तरी टीव्हीवर जुने सिनेमे लागताच चाळीशी ओलांडलेले प्रौढ आजही आवर्जून हे सिनेमे पाहतात. श्रावणामध्ये विशेषत: महादेवाची उपासना केली जाते, हाच नेमका धागा पकडून अनेक सिनेमांमधून शिवभक्तीचा पूर्वापार चालत आलेला वारसाही मराठी सिनेमांमधून दाखविण्यात आला आहे. मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन सासुरवाशिणींना हवेहवेसे वाटणारे श्रावणातील हे सणही सिनेमांमध्ये आवर्जून दाखविले गेले आहेत. गोकुळाष्टमीसारखा तरुणांच्या आवडीचा सण अनेक सिनेमांच्या कथानकाच्या केंद्रस्थानी अनेक वर्षांपर्यंत होता. एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार’ हे गाणे किंवा शम्मी कपूरचे गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला हे गाणं असो आजही ही गाणी वाजवल्याशिवाय तरुणांचे मन भरत नाही. केवळ आध्यात्मिक आणि भक्ती एवढ्यावरच मर्यादित न राहता, श्रावणातील ‘रोमॅन्टिक’ वातावरणही सिनेमांमधून दाखविण्यात आले आहे. नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमातील ‘झीर मीर झीर मीर श्रावण धारा, धुंद करी मदनाचा वारा, ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना’ या गाण्यांसारखी एका शेकडो गाणी रसिकांच्या ओठांवर आजही त् ााजी आहेत. श्रावणसरींनी प्रेमाचे अवघे विश्व व्यापून टाकलेले आहे. सृष्टीची सृजनता, उत्पत्ती, नवोन्मेष मनुष्याच्या आयुष्यातही जसाचा तसा उतरवण्यामध्ये श्रावणाचा मोठा वाटा आहे. मराठीसोबतच हिंदी सिनेमाही याला अपवाद राहिलेला नाही. रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन भिगे आज इस मौसम मे लागी कैसी ये लगन, सावन का महिना पावन करे सोर, मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा अशा गाण्यांनी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.