लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत महिला गटात उपांत्यपूर्व फेरीत श्रेया सागडे, समिक्षा श्रॉफ आणि रमा शहापूरकर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुल, कर्वेनगर येथील टेनिस कोर्ट येथे महिला गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकित श्रेया सागडेने अव्वल मानांकित दिविजा गोडसेचा ६-१ असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. सहाव्या मानांकित समिक्षा श्रॉफ हिने चौथ्या मानांकित श्रुती नांजकरचा टायब्रेकमध्ये ५-५ (७-३) असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. इशिता जाधवने अंतरा मोहोळचा ६-१ असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
रमा शहापूरकरने आठव्या मानांकित निहारिका गोरेचा ६-० असा एकतर्फी पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
पुरुष गटात पहिल्या फेरीत अझर माकंडकर याने राजीव खरेचा तर, अरिंदम बीटने वेद सतदेवेचा पराभव करून आगेकूच केली. नंदन गायकवाड व आदित्य भटवेरा यांनी अनुक्रमे आकर्ष मेवरा व अनुराग निंबाळकरवर मात केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
पुरुष : पहिली फेरी :
आर्यन कुडके वि.वि.आलोक गायकवाड ६-१;
नंदन गायकवाड वि.वि.आकर्ष मेवरा ६-२;
आदित्य भटवेरा वि.वि.अनुराग निंबाळकर ६-२;
दिव्यांक कवीतके वि.वि.अरुण मर्ढेकर ६-१;
यश लेले वि.वि.चेतन दोशी ६-१;
अझर माकंडकर वि.वि.राजीव खरे ६-०;
अरिंदम बीट वि.वि.वेद सतदेवे ६-२;
महिला : उपांत्यपूर्व फेरी:
श्रेया सागडे वि.वि.दिविजा गोडसे (१) ६-१;
इशिता जाधव वि.वि.अंतरा मोहोळ ६-१;
समिक्षा श्रॉफ (६) वि.वि.श्रुती नांजकर (४) ५-५ (७-३);
रमा शहापूरकर वि.वि.निहारिका गोरे(८) ६-०.