पुणे : कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवावर कठोर बंधने घालण्यात आली असून ' श्रीं 'ची आरती व पुजेसाठी ५ व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. त्याचवेळी गणेश मंडळाबाहेर हार, नारळ, मिठाई, प्रसाद इत्यादींची दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर गणेश मंडळांनी जाहिरात प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी़ तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातींना प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकाने गणेश मंडळे, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात सार्वजनिक आरोग्याचे प्राधान्य लक्षात घेऊन निर्णयांना सर्वांनी सकारात्मक समर्थन दिले होते़ त्यानुसार पोलिसांनीगणेशोत्सवासाठी मंडळांना आचारसंहिता प्रस्तावित केली आहे. .................................
प्रतिष्ठापना आणि दर्शनगणेश मूर्ती खरेदी मंडळांनी व नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने करावी़ श्रीचे आगमन व विसर्जनाच्या वेळी कमीत कमी लोक एकत्र जमतील़ मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. ज्या मंडळांची मंदिरे आहेत, त्यांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात करावी़ अन्य साधारण परिस्थितीत छोट्या मंडपाना परवानगी देण्यात येईल. श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन करण्यात यावी. ऑनलाईन टोकन, डिजिटल पास सुविधा देताना वेळेची मर्यादा ठेवावी लागणार आहे़. रिक्षा व इतर वाहने जाण्याकरीता आवश्यक तेवढी मोकळी जागा ठेवावी. सॅनिटायझेशन करीता विविध साधने मंडळांनी ठेवावीत.................................
पूजा
गणेशाची पूजा व आरतीसाठी जास्तीत जास्त ५ व्यक्ती हजर असतील. त्यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापर अनिवार्य आहे. गर्दी होतील, असे उपक्रम टाळावेत. आरती व पूजन मंडळांच्या कार्यकर्त्यांनीच करावी. .......................
श्री विसर्जनश्रींचे विसर्जन मंडळातच विधिवत करावे़ अन्नदान, महाप्रसाद, मिरवणूका काढता येणार नाहीत. महापालिका विसर्जन घाट व हौदांची व्यवस्था करणार नाही. आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीतकमी वेळ थांबावे़ गणेश मुर्ती आणि निर्माल्य महापालिकेने घेऊन जाण्याची व्यवस्था केली आहे़ सोसायट्यांमध्ये कृत्रिम हौद तयार करुन घरगुती गणपतीचे विसर्जन करावे....................
सुरक्षासुरक्षेसाठी मंडळांनी सर्व काळजी घ्यावी, श्रीच्या मुर्तीच्या रक्षणासाठी कमीत कमी ५ कार्यकर्ते अथवा खासगी सुरक्षा रक्षक २४ तास हजर असावेत..........................
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाप्रतिबंधित क्षेत्रात येणाऱ्या गणेश मंडळांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. गणेश मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी आरोग्य सेतून वापरणे बंधनकारक आहे. ........४ दिवस १२ पर्यंत परवानगीगणेशोत्सवाच्या काळात पाचवा दिवस (२६ ऑगस्ट), सातवा दिवस (२८), दहावा दिवस (३१) आणि अनंत चर्तुदशी (१ सप्टेंबर) या ४ दिवशी ध्वनीवर्धक वापराला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. इतर दिवशी रात्री १० वाजेपर्यंत परवानगी राहील.