मंचर शहराचे कुलदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी व यावर्षी यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे.यावर्षी यात्रा कमिटीच्या झालेल्या बैठकीत नागरिकांनी घरूनच कुलदैवताचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले होते. यात्रा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. उपसरपंच युवराज बाणखेले यांच्या हस्ते सकाळी अभिषेक संपन्न झाला. संतोष काका त्रिवेदी यांनी पौरोहित्य केले. प्रतीक थोरात यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. या वेळी कार्याध्यक्ष प्रवीण मोरडे, जे. के. थोरात, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, कैलास गांजाळे, पंडित माशेरे, अशोक गांजाळे, वसंतराव बाणखेले, लक्ष्मण थोरात,दत्ताशेठ थोरात, सुरेश निघोट, जगदीश घिसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले यांच्या हस्ते आरती करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शन बंद ठेवण्यात आले होते. तसेच इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.
कुलदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला.