अभियानाच्या निमित्ताने मंचर शहरात भव्य पदयाञाही काढण्यात आली.
पदयाञेची सुरूवात ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या मंदिरात तळीभंडार करुन तसेच श्रीराम मंदिरात आरती घेऊन झाली. पदयाञेच्या मार्गात रांगोळ्या काढून तसेच फुलांची उधळण करुन स्वागत करण्यात आले. या पदयाञेचा समारोपावेळी जे कारसेवक आंबेगाव तालुक्यातुन कारसेवेसाठी अयोध्येला गेले होते. त्यांचा मान-सन्मान करण्यात आला. या पदयाञेत दुर्गा वाहिनी पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजिका अँड. मृणालिनी पडवळ, बजरंग दल जिल्हा संयोजक संतोष खामकर, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ तालुका कार्यवाह जयप्रकाश वळसे, दुर्गा वाहिनी जिल्हा संयोजिका अँड.स्वप्ना पिंगळे, जनजाती कल्याण आश्रमाचे जिल्हा प्रमुख आबा इंदोरे, माजी सरपंच दत्ता गांजाळे, माजी उपसरपंच महेश थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बेंडे, ग्रामपंचायत सदस्य युवराज बाणखेले, पंचायत समिती संदस्य राजाराम बाणखेले आदी उपस्थित होते.
२३ मंचर निधीसंकलन