शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

यंदाच्या वर्षीही रंगणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा 'ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 10:41 PM

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम "स्वरभास्कर"

ठळक मुद्देमहोत्सवातील कार्यक्रमांमध्ये दिग्गज कलाकारांचा सहभाग

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यावर राज्य शासनाने निर्बंध घातले असल्याने दुसरा ''श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव" आयोजित करण्यात आला आहे.10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात कीर्तन, काव्य, चित्रपट संगीत, महाराष्ट्रातील कला, शास्त्रीय संगीत असे विविध कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'स्वरभास्कर' हा विशेष कार्यक्रम महोत्सवात सादर होणार आहे. 

उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी या महोत्सवाविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदाच गणेशोत्सव साधेपणानं साजरा करावा लागला. त्यामुळे गणेशोत्सवाची आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा जपण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव' हा अनोखा महोत्सव आयोजित केला होता. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने ऑनलाइनच सांस्कृतिक महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे.   

या प्रसंगी अध्यक्ष संजीव जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब निकम, सचिव दिलीप आडकर, सहसचिव मिलिंद सातव, खजिनदार सुरज रेणुसे आणि विनोद सातव उपस्थित होते.

10 ते 19 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे राष्ट्रीय कीर्तन, प्रसिद्ध गायक जावेद अली यांचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम, पं. विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'बियाँड बॉलिवूड', महाराष्ट्राची सांगीतिक परंपरा उलगडणारा 'रंग महाराष्ट्राचे', कवी संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या स्वरचित कवितांचा 'ईर्शाद',  'स्वरभास्कर' हा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना स्वरवंदना  देणारा पं. आनंद भाटे, पं. जयतीर्थ मेवुंडी, पं. रघुनंदन पणशीकर व पं. शौनक अभिषेकी यांचा कार्यक्रम, ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांना समर्पित स्वरवंदना देण्यासाठी राकेश चौरासिया, अमर ओक, निलेश देशपांडे आणि वरद कठापूरकर यांचा 'हरि--प्रसाद', हृषिकेश रानडे, प्रियांका बर्वे, विश्वजित बोरवणकर, आनंदी जोशी यांचा 'मेहफिल Unlocked', राजकीय नेत्यांशी गप्पांचा 'रंगारी कट्टा' हे कार्यक्रम सादर होणार आहेत. www.bhaurangari.com  या संकेतस्थळावर महोत्सवातील सर्व कार्यक्रम घरबसल्या विनामूल्य पाहता येतील.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवonlineऑनलाइन