कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नसरापूर मधील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. संचारबंदी लागू असल्याने श्रीराम जन्मोत्सव नसरापूरकरांना अनुभवता आला नाही. नसरापूर येथील रामनवमी जन्मोत्सवाला १९० वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे.
दुपारी १२:३० वाजता रामजन्माचे कीर्तनानंतर परंपरेने फ़ुलांनी सजवलेल्या श्री रामाच्या पाळ्ण्याची दोरी येथील महिलांनी ओढली.त्यावेळी श्रीरामावर पुष्पव्रुष्टी करण्यात आली. यावेळी विजय जंगम, दत्तात्रय महामुनी, हनुमंत दळवी,ज्ञानेश्वर महाजन,गणेश पालकर, पुरुषोत्तम पोरे, सुरेश विपट, सुलभा विपट यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
नसरापूर (ता.भोर) येथे १९० वर्षांची रामनवमी जन्मोत्सव साधेपणाने करण्यात आला.