शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

महाशिवरात्रीला भीमाशंकरमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:17 AM

लोकमत न्यूज नेटवर्क भीमाशंकर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्र यात्रा रद्द करण्यात आली असली, तरी मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भीमाशंकर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्र यात्रा रद्द करण्यात आली असली, तरी मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम विधीवत पध्दतीने साजरे करण्यात आले. रात्री बारा वाजता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. कोरोनाचे संकट यंदा तरी टळू दे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी श्री भीमाशंकराला साद घातली. दर वर्षी असणारी भाविकांची गर्दी मंदिर कोरोनामुळे बंद असल्याने यंदा मात्र पाहायला मिळाली नाही.

भोसरीचे आमदार महेश लांडगे, देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश कौदरे, उपाध्यक्ष विकास ढगे पाटील, प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, विक्रांत चव्हाण यांच्या उपस्थितीत व देवस्थानचे विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर, संजय गवांदे, संतोष कोडिलकर, पुरुषोत्तम गवांदे गुरुजी, आशिष कोडिलकर यांच्या वेदपठनात शासकीय पूजा पार पडली. शासकीय पूजेनंतर खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीची यात्रा सुरू होते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे मंदिर बंद करण्यात आले. महाशिवरात्रीच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या पहाटेच्या दर्शनास मध्यरात्री बारा वाजल्यापासून रांग लागते. मात्र, यावर्षी दर्शनरांगेत शुकशुकाट होता. दरवर्षी बेल, फुल, प्रसाद, पेढा व इतर खाद्य पदार्थांनीनी भरलेली दुकाने यावर्षी मात्र पूर्ण बंद होती. गेल्या वर्षभरापासून भीमाशंकर मधील पूर्ण व्यवसाय थंड पडला होता. महाशिवरात्रीला काही तरी होईल असे वाटत होते. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने यात्रा रद्द केला. हा निर्णय योग्य असला तरी आमचे मोठे नुकसान झाले असल्याचे मत दुकानदारांनी व्यक्त केली.

चौकट

ठिकठिकाणी चेकनाके

मंचर ते भीमाशंकर व खेड ते भीमाशंकर दरम्यान ठिकठिकाणी चेकनाके लावण्यात आले होते. तसेच भीमाशंकरकडे जाणाऱ्या गाड्या अडवून परत पाठवील्या जात होत्या. प्रशासनाने या पूर्वीच भीमाशंकर यात्रा होणार नसल्याचे जाहीर केल्याने रस्त्याने वाहनांची गर्दी फार दिसत नव्हती. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लांभाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी गर्दी होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली.

चौकट

महाशिवरात्रीला भीमाशंकर दर्शनासाठी शिवभक्तांना येता आले नसल्याची खंत आम्हाला आहे. दर वर्षी गजबजणारा हा परिसर आज एकदम शांत आहे. भाविकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भीमाशंकरकडे येण्याचे टाळले. महाशिवरात्रीला दिवसभरात नित्यनियमाचे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. या व्यतीरिक्त मंदिर बंद ठेवण्यात आले होते. लवकरच सर्वजण या कोरोनाच्या संकटातून बाहेर येवोत व सर्वांना पहिल्यासारखे मुक्त दर्शन घेता यावे अशी विनंती भीमाशंकरकडे केली असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी सांगितले.

चौकट

महाशिवरात्रीमुळे गर्दी होऊ नये व गर्दीतून कोरोनाचा रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी अतिशय कमी लोकांमध्ये व प्रतीकात्मक असा महाशिवरात्रीचा उत्सव भीमाशंकरमध्ये साजरा केला जात आहे. लोकांनीही दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करून कोरोनाला आपल्या पासून दूर ठेवावे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना आज भीमाशंकराकडे केली.

-डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

.

10032021-ॅँङ्म-ि02 - श्रीक्षेत्र भीमाशंकर शासकीय महापूजेसाठी बसलेले देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे सहपत्नीक, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख सहपत्नीक.

10032021-ॅँङ्म-ि03 - महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र भीमाशंकरचे सजवलेले प्राचिन शिवलिंग

10032021-ॅँङ्म-ि04 - श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे बसस्थानकाजवळ पोलिसांनी लावलेला बंदोबस्त महाशिवरात्री निमित्त

10032021-ॅँङ्म-ि05 - श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात शुकशुकाट.

10032021-ॅँङ्म-ि06 - श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील बंद असलेली दुकाने.

10032021-ॅँङ्म-ि07 - श्रीक्षेत्र भीमाशंकर कडे जाणारे प्रवेशव्दार बंद करून बंदचा लावलेला फलक.

10032021-ॅँङ्म-ि08 - श्रीक्षेत्र भीमाशंकर मधील बंद असलेली दुकाने.

10032021-ॅँङ्म-ि09 - महाशिवरात्री निमित्त विद्युत रोषणाईने सजवलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर.