कान्हूरमेसाई : घरपोच आहात योजनेअंतर्गत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना तसेच गरोदर स्त्रिया व स्तनदा माता अशा एकूण १६ हजार ९१० लाभार्थ्यांना घरपोच आहार दिला जातो. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून खाद्यतेलाचा पुरवठा केला जात नसल्याने त्या बदल्यात साखर देऊन समाधान केले जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना योग्य त्या कॅलरीज मिळत नसल्याने घरपोच आहार योजना सध्या फोल ठरू पाहत आहे.
कोरोना काळात ह्युमॅनिटी वाढविण्यासाठी संतुलित आहार हा गरजेचा आहे बालकांचे कुपोषण होऊ नये जन्माला येणारे बाळ सुदृढ व्हावे या उदात्त हेतूने शासनाने घरपोच आहार योजना सुरू केली एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील १३ हजार ३४ बालकांना तर ३ हजार ८७६ गरोदर व स्तनदा माता अशा सोळा हजार नऊशे दहा लाभार्थ्यांना घरपोच आहार वाटप सुरू आहे. मात्र गत ५ महिन्यांपासून खाद्यतेलाचा पुरवठा केला जात नसल्याने घरपोच आहार योजना फोल ठरू पाहत आहे. तेल हे मानवी जीवनामध्ये महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र गत दोन महिन्यांपासून तेलाचा पुरवठा बंद असल्याने घरपोच आहाराचा बोजवारा उडाला आहे.
बालविकास प्रकल्प कार्यालय सूत्रांनी जानेवारी २०२१ महिन्यापासून आहार योजने अंतर्गत तेलाचा पुरवठा बंद झाल्याचे सांगितले.
कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र दुसरीकडे आहे त्या योजना सक्षमपणे राबविण्यासाठी यंत्रणा अपयशी ठरत असल्याने या संकटावर मात कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
--
लाचा पुरवत पुरवठा करण्याची मागणी...
--
शरीराला पुरेशा कॅलरीज मिळण्यासाठी तेल हा महत्त्वाचा घटक आहे, पण तेल वाटप बंद झाले झाल्याने लाभार्थी वंचित राहत आहेत. तेलामुळे शरीराची झीज भरून काढते त्यामुळे ते बंद करून साखर देण्यामागचा हेतू काय हे अद्याप कळाले नाही. तेलाचा पुरवठा करण्याची तरतूद असतानाही तेल बंद का केले, याची माहिती मात्र अधिकाऱ्यांनी दिली नाही. त्यामुळे साखरेऐवजी पुन्हा तेल सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.