लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित पंधरा हजार डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत जागतिक क्रमवारीत ४६८ व्या स्थानी असलेल्या भारताच्या सिद्धार्थ रावत याला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. तर दुहेरीत एन. विजय सुंदर प्रशांत व विष्णू वर्धन या भारताच्या जोडीला अग्रमानांकन देण्यात आले आहे.
एकेरीत आर्यलँडच्या सिमॉन कार व ग्रेट ब्रिटनच्या एडन म्यूकुक यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे मानांकन देण्यात आले. अमेरिकेच्या ऑलिव्हर क्रॉफर्डला चौथे, स्वीडनच्या जोनाथन म्रिधाला पाचवे, तर भारताच्या मनीष सुरेशकुमारला सहावे आणि नुकताच राष्ट्रीय विजेता ठरलेला पुण्याचा अर्जुन कढेला सातवे व लखनऊ व इंदोर येथील आयटीएफ स्पर्धेतील विजेत्या अमेरिकेच्या झेन खानला आठवे मानांकन मिळाले आहे.
मुख्य ड्रॉसाठी ९८० चा कट ऑफ असून यामध्ये चौदा परदेशी खेळाडूंसह अठरा भारतीय खेळाडूमध्ये चार वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे.
स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे :
पुरुष : एकेरी : १) सिद्धार्थ रावत (४६८) २. सिमॉन कार (आर्यलँड, ५४६) ३. एडन म्यूकुक (ग्रेट ब्रिटन, ५५९), ४. ऑलिव्हर क्रॉफर्ड (अमेरिका, ५७६) ५. जोनाथन म्रिधा (स्वीडन, ५८५) ६. मनीष सुरेशकुमार (६७१) ७. अर्जुन कढे (७०८) ८. झेन खान (अमेरिका ७१७)
दुहेरी :
१. एन. विजय सुंदर प्रशांत-विष्णू वर्धन
२. लुका कॅस्टलनुव्हो, स्वित्झर्लंड-अर्जुन कढे
३. फिलिप बार्जेव्ही, स्वीडन-जोनाथन म्रिधा, स्वीडन,
४. अनिरुद्ध चंद्रसेकर, भारत-निकी पोनाच्चा कलियांदा, भारत