शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
4
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
6
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
7
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
9
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
10
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
11
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
12
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
13
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
14
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
15
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
16
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
19
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
20
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."

पीएमपीएमएल बस पास दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 1:45 PM

पीएमपीकडून बस पास मध्ये अनावश्यक बेकायदा दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ रद्द करावी, यासाठी विविध संघटनांमार्फत स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबस पास दरवाढ विरोधी स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात शनिवार २८ आॅक्टोबर २०१७ रोजी होणार कोणतीही मंजूर न घेता पीएमपीने परस्पर दरवाढ केली आहे़ : सतीश चितळे

पुणे : पीएमपीकडून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर बस पास मध्ये अनावश्यक बेकायदा दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ रद्द करावी, यासाठी विविध संघटनांमार्फत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. बस पास दरवाढ विरोधी स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात शनिवार २८ आॅक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता म्हात्रे पूलाजवळील इंद्रधनुष्य सभागृह येथे होणार आहे. पीएमपी प्रवासी मंच, पुणे व पिंपरी चिंचवड येथील ११ स्वयंसेवी संस्था, संघटना मोहिमेत सहभागी होणार आहेत. पीएमपीएमएलने १ सप्टेंबर २०१७ पासून प्रवाशांवर संपूर्णपणे अन्याय, जाचक व बेकायदेशीर बस पास दरवाढ लादली आहे. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या लाखो ज्येष्ठ नागरिक, चाकरमाने, विद्यार्थी, कष्टकरी, मोलकरणी, नर्सेस, फेरीवाले व इतर सामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. या दरवाढीला विरोध करण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली आहे. पीएमपीने सर्व प्रकारच्या पासदरात वाढ केली आहे़ पूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी ४० रुपयांचा पास होता, तो आता ७०० रुपये केला आहे़ विद्यार्थी पास ४०० रुपयांवरुन ६०० रुपये आणि सामान्यांसाठीचा पास १२०० रुपयांवरुन १४०० रुपये केला आहे़ याशिवाय दैनिक पास ५० रुपये होता तसेच ठराविक मार्गासाठी पास दिला जायचा़ नोकरदार तसेच एकाच मार्गावर प्रवास करणार्‍यांसाठी तो फायदेशीर ठरत असे़ तोही पास पीएमपीने बंद केला आहे़ ठराविक मार्गावरील पास घेणार्‍यांनी त्याबाबत चौकशी केली तर त्यांना १४०० रुपयांचा पास घेण्यास सांगितले जाते़ पूर्वी ज्या मार्गासाठी ६०० ते ७०० रुपये खर्च येत असे़ त्यासाठी जवळपास दुप्पट खर्च करायला लागत असल्याने असंख्य नोकरदार आणि कामगारांनी हे पास घेणे बंद केले आहे़ याबाबत सतीश चितळे यांनी सांगितले की, पीएमपीला दरवाढ करायची असेल तर, त्यांना रिजनल टॉन्सपोर्ट अ‍ॅथोरिटी (आरटीए) आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांना प्रस्ताव सादर करुन त्यांच्याकडून मंजूरी घ्यावी लागते़ अशी कोणतीही मंजूर न घेता पीएमपीने परस्पर दरवाढ केली आहे़ या दरवाढीने पास घेणार्‍यांची संख्या कमी झाली असून उलट पीएमपीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे़ या स्वाक्षरी मोहिमेत लोकायत पुणे, परिसर पुणे, जनवादी महिला संघटना,शहीद भगतसिंग युवा मंच, पिंपरी-चिंचवड, पिंपरी-चिंचवड सिटीझन्स फोरम,जाणीव संघटना, पुणे, आम आदमी पार्टी, पुणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुणे, चेतना नागरिक  मंच,पीएमपी प्रवासी मंच, सजग नागरिक मंच आदी संघटना मोहिमेत सहभागी होणार आहेत.  प्रवासी मेळावा सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्याला मेजर जनरल सुधीर जटार (निवृत्त), चेतन तुपे, किरण मोघे, मारुती भापकर, सुजीत पटवर्धन, संजय शंके, कर्नल बाबूराव चौधरी, रोहन निघोजकर, राजेश चौधरी, ऋषिकेश येवलेकर, धनंजय शेडबाळे, मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, विवेक वेलणकर, संजय शितोळे, सतीश चितळे, यतीश देवडिगा हे उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :Puneपुणे