सहभागी व्यक्तीने आपले नाव, भ्रमणध्वनी, शहर, राज्य, देश अशी माहिती भरून त्याखाली आपली मराठी भाषेतील स्वाक्षरी करून ९४२२००२०५२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुढीपाडव्याचे औचित्य साधून १३ एप्रिल रोजी होणार आहे. या स्पर्धेत जगभरातील सर्व मराठीप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांनी केले आहे.
मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला बातम्यांच्या माध्यमातून मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनाचे काम करणाऱ्या मराठी वृत्तपत्रांमधील निवडक पत्रकारांचा सन्मान या निमित्ताने केला. राज्यातील साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील २० ज्येष्ठ व्यक्तींचाही सन्मान केला. लोकप्रतिनिधी आणि साहित्यिक अशा सुमारे १००० मान्यवरांना शुभेच्छापत्रे पाठवली जाणार आहेत. त्याचप्रमाणे पुस्तकप्रेमी नागरिकांना दहा हजार ग्रंथखूणपट्टीचे वाटप केले जाणार आहे.